AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना केले अनोखे अभिवादन

आदिवासी वीरां केलेला पराक्रमाला याआधीच्या सरकारने योग्य सन्मान दिला नव्हता. आता केंद्रा नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर आदिवासी परंपरा आणि त्यांच्या अस्मिता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास नव्या पिढ्यांसाठी सुलभ करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना केले अनोखे अभिवादन
pm modi
| Updated on: Nov 14, 2025 | 6:06 PM
Share

अनेक दशकांपासून भारताच्या आदिवासी वीरांनी स्वातंत्र्य लढ्यात दाखवलेले पराक्रम इतिहासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या वीरांच्या कथांना नव्याने उजळणी मिळाली आहे.स्मारके, स्मरणोत्सव, प्रकाशने, प्रतीकात्मक उपक्रम आणि आदिवासी वीरांच्या वंशजांशी थेट संवाद या माध्यमातून आदिवासी वीरांचा लौकिक आता राष्ट्रीय वारशाचा अविभाज्य भाग बनत आहे.

राष्ट्रीय स्मरणोत्सवांद्वारे इतिहासाचा गौरव

आदिवासी इतिहास जीवंत ठेवण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिन 15 नोव्हेंबरला ‘आदिवासी गौरव दिवस’ म्हणून घोषीत केले. कालांतराने हे स्मरणोत्सव ‘आदिवासी गौरव सप्ताह’मध्ये विस्तारित झाले असून सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने, शैक्षणिक उपक्रम यांद्वारे हा वारसा देशभर पोहोचवला जात आहे.

2023 मध्ये, राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीचा राष्ट्रीय उत्सव जाहीर करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी अनेक ऐतिहासिक स्थळांवर आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे:

हूल दिवसानिमित्त संथाळ वीर सिद्धो–कान्हो, चांद–भैरव आणि फूलो–झानो यांच्या शौर्यस्मृतींना नमन.

राजस्थानातील बांसवाड्यातील ‘मांगढ धाम की गौरव गाथा’ समारंभात गोविंद गुरू, तिलका मांझी, सिद्धो–कान्हो आणि बुधू भगत यांसह इतर वीरांचा गौरव करण्यात आला. झारखंडातील उलिहाटू येथील बिरसा मुंडांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन करणारे ते पहिले कार्यरत पंतप्रधान ठरले आहेत.

वंशजांशी संवाद: इतिहासाला मानवी स्पर्श –

पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधून इतिहासाला जीवंत करणारा मानवी दुवा निर्माण केला आहे.

ओडिशातील पैका बिद्रोहातील बक्षी जगबंधू, रिंदो मज्ही, लक्ष्मी पांडा यांच्या कुटुंबीयांचा सत्कार.

शहीद वीर नारायण सिंह यांच्या वंशजांशी भेट घेऊन त्यांच्या कल्याणाची चौकशी.

बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तसेच सिद्धो–कान्हो यांसह अनेक आदिवासी वीरांच्या वंशजांना आमंत्रण.

या उपक्रमांमुळे त्याग आणि संघर्षाच्या या कथा केवळ स्मारकांमध्ये नव्हे तर कुटुंबीयांच्या माध्यमातूनही जतन होत आहेत.

स्मारके आणि सार्वजनिक स्थळे: वारसा जतन करण्याची नवी दृष्टी –

2016 च्या स्वातंत्र्यदिन भाषणात जाहीर केलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांच्या संकल्पनेनुसार 10 राज्यांमध्ये 11 संग्रहालयांची निर्मिती सुरू आहे. त्यापैकी तीन संग्रहालये उद्घाटन झाली आहेत:

1 ) भगवान बिरसा मुंडा मेमोरियल पार्क-सह-स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, रांची

2 ) बाडल भोई राज्य आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, छिंदवाडा

3 ) राजा शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, जबलपूर

इतर उपक्रम: –

जबलपूर येथे वीरांगना रानी दुर्गावती स्मारक आणि उद्यानासाठी भूमिपूजन.

राणी मां गाईदिन्ल्यू आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय उभारणी.

रायपुरमध्ये शहीद वीर नारायण सिंह डिजिटल संग्रहालय—भारताचे पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय.

ही सर्व स्मारके आणि संग्रहालये आदिवासी गौरवाचा नवा सांस्कृतिक नकाशा तयार करत आहेत.

सार्वजनिक स्थळांत वीरांचा गौरव –

देशभरातील सार्वजनिक स्थळांनाही आदिवासी नायकांच्या नावांनी सन्मानित करण्यात आले आहे:

राणी कमलापती रेल्वे स्टेशन, भोपाल

जननायक तंट्या भील स्टेशन आणि तंट्या मामा भील विद्यापीठ

आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे अल्लुरी सीताराम राजूंचा 30 फुटांचा पुतळा

रांचीमध्ये बिरसा मुंडांचा भव्य पुतळा

बिरसा मुंडा आदिवासी गौरव उपवन—आदिवासी प्रदेशांमध्ये इतिहास जतनाचे केंद्र

पुस्तके, कॉमिक्स आणि डिजिटल कथा: इतिहास सर्वांसाठी

पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास सर्व पिढ्यांसाठी सुलभ करण्यात आला आहे.

आदी शौर्य ई-बुक—150+ वर्षांच्या आदिवासी प्रतिकाराचा डिजिटल इतिहास –

Inspiring Tribal Heritage of India—आदिवासी कला, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

Amar Chitra Katha सोबत Tribal Leaders of the Freedom Struggle—20 आदिवासी नायकांची कॉमिक कथा प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक सन्मान: नाणी, तिकिटे आणि स्मृती, पैका बिद्रोह स्मरणार्थ स्मारक नाणी आणि तिकिटांचे प्रकाशन, बिरसा मुंडांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नाणे प्रकाशन, राणी गाईदिन्ल्यू यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यात येणार आहे.

इतिहासाच्या केंद्र स्थानी आणि भारताच्या हृदयात –

पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना इतिहासाच्या केंद्रस्थानी आणण्यात आले आहे.बिरसा मुंडा, वीर नारायण सिंह, गोविंद गुरू, सिद्धो–कान्हो, राणी गाईदिन्ल्यू, अल्लुरी सीताराम राजू आणि असंख्य आदिवासी वीरांचे शौर्य आता राष्ट्रीय स्मरणाचा अविभाज्य भाग झाले असून स्मारकांच्या आणि पुस्तकांच्या रुपाने नव्यापिढ्यांच्या मनात आणि भारताच्या आत्म्यात त्यांच्या स्मृती कायम स्वरुपी रहाणार आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.