PM Narendra Modi Birthday : मोदी किती तास झोपतात? डिनर किती वाजता करतात? वयाच्या 75 व्या वर्षी फिटनेसच रहस्य काय? कशी आहे लाइफस्टाइल?
PM Narendra Modi Birthday : आज 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झालेत. या वयातही ते नेहमी एनर्जीने भरलेले असतात. या मागच कारण आहे, डिसिप्लिन लाइफस्टाइल. जाणून घेऊया डाएटपासून रुटीनपर्यंत पीएम मोदी इतके फिट आणि हेल्दी कसे?.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभावी व्यक्तीमत्वासाठी ओळखले जातात. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं. कारण देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मात्र, तरीही सकाळी उठण्यापासून ते खाणंपिणं आणि फिजिकल एक्टिविटीपर्यंत त्यांची लाइफस्टाइल खूप संतुलित आहे. ते युवकांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देतात. त्याचसाठी फिट इंडिया मूवमेंटची सुरुवात केली. त्याचा उद्देश डेली रूटीनमध्ये लोकांना फिजिकली एक्टिव ठेवणं आणि खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल जागरुक ठेवणं हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या जन्मदिनाच्या प्रसंगी ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतात, जाणून घेऊया.
सध्याच्या जमान्यात लोकांना कमी वयात अनेक आजार झालेत. याचं कारण आहे खराब दीनचर्या. बऱ्याच लोकांच म्हणणं असतं की, त्यांचं वेळापत्र खूप व्यस्त आहे. त्यामुळे फिजिकल एक्टिविटी आणि खाण्यापिण्याच रुटीन बिघडतं. पण पीएम मोदी इतके व्यस्त असूनही हेल्थ आणि फिटनेसला पहिलं प्राधान्य देतात. तुम्ही सुद्धा त्यांच्या डेली रुटीनमधून प्रेरणा घेऊ शकतात.
मोदी सकाळी किती वाजता उठतात?
वेगवेगळ्या बैठका, सभांमुळे पीएम मोदी रात्री उशिरापर्यंत जागं रहावं लागतं. मात्र, तरीही ते दुसऱ्या दिवशी कुठलही कारण न देता आपलं रुटीन पाळतात. रिपोर्ट्सनुसार, नरेंद्र मोदी सकाळी चार वाजता उठतात. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हापासूनची त्यांची ही सवय आहे. ते साडेतीन ते चार तासाची झोप घेतात. सकाळी उठल्यानंतर ते काहीवेळ चालतात. योगामध्ये सूर्य नमस्कार आणि मेडिटेशन त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. त्यामुळे त्यांना एनर्जेटिक रहायला मदत होते.
मोदींना कुठले पदार्थ आवडतात?
पीएम मोदी यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितलेलं की, ते खाण्याचे फार शौकीन नाहीयत. म्हणून ते जिथे जातात, तिथे साध्या खाण्याला त्यांची पसंती असते. प्राइम मिनिस्टर मोदी यांचा डाएट खूप सिंपल पण पोषणाने भरपूर आहे. सकाळी ते आल्याची चहा पितात. ब्रेकफास्टमध्ये उकळवलेले किंवा भाजलेले पदार्थ असतात. पीएम मोदींच्या जेवणात तेल खूप कमी असतं. खिचड़ी, उपमा, कडी सारखे पदार्थ त्यांना आवडतात. एकदा त्यांनी सांगितलेलं की, मोरिंगा म्हणजे सहजनच्या फलीचा पराठा याचा डाएटमध्ये समावेश केलेला.गुजराती असल्याने त्यांना थेपला,ढोकळा सारख्या पारंपारिक डिशेस खूप आवडतात.
नवरात्रीमध्ये व्रत ठेवतात
पीएम मोदी जवळपास पाच दशकापासून नवरात्रीमध्ये व्रत ठेवतात. त्यांनी स्वत: एका इंटरव्यूमध्ये या बद्दल सांगितलेलं. व्रत काळात ते दररोज एकचवेळ फलाहार करतात. महत्वाच म्हणजे नऊ दिवस ते वेगवेगळी फळ खात नाहीत.पहिल्या दिवशी जे फळ खाणार तेच दुसऱ्याच दिवशी खाणार.
मोदी डिनर किती वाजता करतात?
पीएम मोदी लवकर डिनर करतात. संध्याकाळी 6 नंतर खाणं टाळतात. आयुर्वेदातही सांगितलय, सूर्य मावळल्यानंतर काही खाऊ नये. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. तुमच्या संपूर्ण शरीराला खाण्याचा फायदा मिळतो. तुम्ही सुद्धा तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत संतुलन ठेऊन हेल्दी लाईफस्टाइल मेन्टेन करु शकता.
