AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : नरेंद्र मोदींची GST बाबत मोठी घोषणा, आता संपूर्ण भारतात…नेमका काय फायदा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे. त्यांनी जीएसटीवर महत्त्वाची माहिती दिली आहे.   

Narendra Modi : नरेंद्र मोदींची GST बाबत मोठी घोषणा, आता संपूर्ण भारतात...नेमका काय फायदा होणार?
narendra modi
| Updated on: Sep 21, 2025 | 5:22 PM
Share

Narendra Modi On GST : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 सप्टेंबर) जनतेला संबोधित केले. नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे. त्यांनी जीएसटीवर महत्त्वाची माहिती दिली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून जीएसटीचे नवे दर लागू होतील, अशी घोषणा यावेळी मोदी यांनी केली. तसेच हा नवा कर लागू झाल्यानंतर भारतीयांचा एका प्रकारे बचत उत्सव सुरू होईल, असेही यावेळी मोदी म्हणाले. तसेच या नव्या जीएसटी दरामुळे शेतकरी, महिला, युवक यांचा फायदा होईल, असेही भाष्य यावेळी मोदी यांनी जनेला संबोधित करताना केले.

22 सप्टेंबरपासून जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होणार

आता नवरात्रीचे पर्व चालू होणार आहे. तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबरपासून सुर्योदयानंतर जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होणार आहेत. एका प्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे. या जीएसटी बचत उत्सवात तुमची बचत वाढणार आहे. तुम्ही तुमच्या पसंदीच्या वस्तूंना खरेदी करू शकाल.

देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार- नरेंद्र मोदी

यामुळे मध्यमवर्ग, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, नागरिक, उद्योजक अशा सर्वांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होणार आहे. म्हणजेच सणांच्या या उत्सवात सर्वांचेच तोंड गोड होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटीच्या नव्या सुधारणांबद्दल शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकासाला गतिमान करतील. व्यवसायांना आणखी सोपे केले जाईल. या नव्या सुधारणांमुळे प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीने यायला मदत होईल. 2017 साली भारताने जीएसटीच्या सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकले होते. नवा इतिहास रचण्याची ही एक सुरुवात होती. अगोदर देशातील जनता वेगवेगळ्या करांमध्ये अडकलेली होती.

अगोदर एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पोहोचवायचा असेल तर कित्येक फॉर्म भरावे लागत होते. प्रत्येक ठिकाणी कराचे नवे नियम होते. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. आता मात्र वन नेशन नव टॅक्स या धोरणामुळे अडचणी कमी होतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...