PM Modi Video Conference Live Update | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी – सूत्र

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होत आहे. (PM Narendra Modi Video Conference with Chief Ministers on Corona Lockdown)

PM Modi Video Conference Live Update | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी - सूत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. 17 मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन असल्याने त्यापुढे काय रणनीती आखायची, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, याविषयी मोदी सर्व मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनही बैठकीत सहभागी झाल्या आहेत. (PM Narendra Modi Video Conference with Chief Ministers on Corona Lockdown)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=”अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी” date=”11/05/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मागणी” date=”11/05/2020,7:25PM” class=”svt-cd-green” ] मुंबई मध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी – सूत्र” date=”11/05/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ] LIVE – महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठवून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत चर्चा, लॉकडाऊन वाढवण्याची मागणी, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”तामिळनाडूत 31 मेपर्यंत रेल्वे नको, मुख्यमंत्र्यांची विनंती” date=”11/05/2020,5:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नीतिशकुमार म्हणतात, लॉकडाऊन वाढवा” date=”11/05/2020,3:43PM” class=”svt-cd-green” ] बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे [/svt-event]

[svt-event title=”मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी” date=”11/05/2020,3:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक दुपारी 3 वाजता सुरु झाली. या बैठकीला 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची पाचव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होत आहे.

सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना यावेळी आपले मत मांडण्याची संधी मिळणार आहे. ही बैठक किमान चार तास चालण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात दीर्घकाळ चालणारी बैठक ठरु शकते. कोरोनाच्या परिस्थितीचा राज्यनिहाय आढावा घेण्याबरोबरच मरगळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला? पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सुरुवातीला 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला होता. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होणार, की पुन्हा कालावधी वाढणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

  • पहिली बैठक – 20 मार्च
  • दुसरी बैठक – 2 एप्रिल
  • दुसरी बैठक – 11 एप्रिल
  • तिसरी बैठक – 27 एप्रिल
  • पाचवी बैठक – 11 मे

(PM Narendra Modi Video Conference with Chief Ministers on Corona Lockdown)

Published On - 6:55 pm, Mon, 11 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI