दिल्ली शांत करण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा मैदानात

ईशान्य दिल्लीमध्ये नागिरकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधी हिंसाचारमध्ये आज (26 फेब्रुवारी) सकाळपर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला (Ajit Dobhal on Delhi Violence) आहे.

दिल्ली शांत करण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा मैदानात

दिल्ली : ईशान्य दिल्लीमध्ये नागिरकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधी हिंसाचारमध्ये आज (26 फेब्रुवारी) सकाळपर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला (Ajit Dobhal on Delhi Violence) आहे. दिल्ली येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीच्या सर्व परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते देणार आहेत.

अजित डोभाल यांनी काल (25 फेब्रुवारी) रात्री दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक आणि विशेष आयुक्त श्रीवास्तव यांच्यासोबत जाऊन (Ajit Dobhal on Delhi Violence) जाफराबाद, सीलमपूर या हिंसक विभागाचा दौरा केला. यावेळी डोभाल यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोभाल यांनी मीटिंग घेतली. त्यात हिंसा झाल्यास कडक कारवाई करा. पर्यायी पोलीस आणि निमलष्कर बल तैनात केले जातील, असंही डोभाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, अशी माहिती मिळत आहे.

अमित शाह मंत्रिमंडळ बैठकीत दिल्लीच्या परिस्थितीवर माहिती देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. यामध्ये अमित शाह दिल्लीच्या परिस्थीतीवर चर्चा करणार आहेत. यादरम्यान पोलिसांच्या रणनितीवरही चर्चा केली जाणार आहे. एसएन. श्रीवास्तव यांना दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (लॉ अँड ऑर्डर) बनवले आहे. श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त असतील, असं म्हटलं जात आहे. सध्याचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. ही मुदत 29 फेब्रुवारी संपणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी काल सकाळी शाहदरा हिंसामध्ये जखमी झालेल्या डीसीपी अमित शर्मा यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. शाह यांनी शर्माच्या तब्येतीबद्दल तसेच परिवाराची माहिती (Ajit Dobhal on Delhi Violence) घेतली.

Published On - 12:12 pm, Wed, 26 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI