कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लस अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. ते सर्व संशोधकांच्या हातात आहे. पण त्यावरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. (pm narendra modi meeting on corona vaccine delivery distribution)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:15 PM, 24 Nov 2020

नवी दिल्ली: कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लस अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. ते सर्व संशोधकांच्या हातात आहे. पण त्यावरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका, असंही त्यांनी सांगितलं. (pm narendra modi meeting on corona vaccine delivery distribution)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या टप्प्यात इतर राज्यातील आणखी काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या राज्यातील मुख्यमंत्र्यांना कोरोना संसर्ग पुन्हा वाढताना दिसत असल्याने गाफिल राहू नका. सतर्क राहा, असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी कोरोनाची लस लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच कोरोनाची लस आल्यानंतर फ्रंटलाइनवरील कोरोना योद्ध्यांना या लसीचा पहिला फायदा देण्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या.

कोरोनाची लस कधी येईल हे आपण ठरवू शकत नाही. ते संशोधकांच्या हातात आहे. पण तरीही काही लोक या विषयावर राजकारण करत आहे. कुणाला राजकारण करण्यापासून रोखलं जाऊ शकत नसलं तरी अशा विषयावर राजकारण करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. कोरोनाविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सतर्क राहा. कोणतीही हयगय किंवा निष्काळजीपणा करू नका, असं ते म्हणाले.

कोरोनाबाबत काही सूचना असतील तर त्या लिखित स्वरुपातही पाठवा. त्यावर केंद्र सरकार निश्चित मार्ग काढेल, असंही ते म्हणाले. देशात कोरोना टेस्टिंगच्या नेटवर्कचं काम सुरू आहे. मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचंही काम सुरू आहे. आपल्याकडे कोरोना रुग्णांची निश्चित आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोना लस वाटप कशी करायची याबाबत आपल्याला पूर्ण तयारी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

सुरुवातीला लोकांमध्ये कोरोनाची भीती होती. त्यावेळी काही लोकांनी कोरोना होण्याच्या भीतीने आणि काही लोकांनी कोरोना झाल्याने आत्महत्या केल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले होते. आता लोकांमध्ये समंजसपणा आला आहे. त्यांनी कोरोनाची वस्तुस्थिती समजून घेतली आहे. आता लोक कोरोनाला गंभीरपणे घेत आहेत. काही प्रमाणात का होईना कोरोनाचा संसर्ग कमी झालाय असं आता लोकांना वाटू लागलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

(pm narendra modi meeting on corona vaccine delivery distribution)