AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे, केजरीवाल ते चंद्रशेखर राव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 10 सूचना

प्रत्येक राज्यातील सर्व संप्रदायांच्या धर्मगुरूंची बैठक घ्यावी. त्यांना आपापल्या अनुयायांना या लढ्यात योगदान, सहकार्य करण्याचे आवाहन करावे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले (Narendra Modi message at video conference with Chief Ministers)

ठाकरे, केजरीवाल ते चंद्रशेखर राव; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 10 सूचना
| Updated on: Apr 02, 2020 | 5:13 PM
Share

नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरस’ने आपली आस्था, परंपरा, विश्वास, विचारधारा या सर्वावर हल्लाबोल चढवला आहे. आपल्याला आपल्या विचारधारा, पंथ जपण्यासाठी ‘कोरोना व्हायरस’ला पराजित करावे लागेल. त्यामुळे सर्वांनी एकजूट करण्याची गरज आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. (Narendra Modi message at video conference with Chief Ministers)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यासारखे अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींसोबत बसलेले मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आणि अन्य अधिकाऱ्यांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचं दिसलं.

माझी सर्व राज्य सरकारांना विनंती आहे, त्यांनी प्रत्येक राज्यातील सर्व संप्रदायांच्या धर्मगुरूंची बैठक घ्यावी. त्यांना आपापल्या अनुयायांना या लढ्यात योगदान, सहकार्य करण्याचे आवाहन करावे, नेतृत्व करण्याच्या सूचना द्याव्यात. राज्य, जिल्हा, शहर, ब्लॉक, ठाणे पातळीवर तात्काळ अशा बैठका व्हाव्यात असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 10 सूचना

1. लॉकडाऊन संपवल्यानंतर 15 एप्रिलला लगेच नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत, याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्याटप्प्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील, हे पाहावे

2. देशात आतापर्यंत आपण ‘कोरोना’ला रोखण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत, पण खऱ्या अर्थाने लढाई आता सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले, असे नाही. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजेतच, असे नाही. चांगल्या घरगुती कपड्याचा उपयोग होऊ शकतो. 21 दिवसांची मेहनत वाया जाऊ देऊ नका.

3. कोरोनाचा लढा सुरुच राहील, पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्त्वाचे आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील, याची काळजी घ्या. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञानाचा अवलंब करा.

4. ‘कोरोना’चा मुकाबला फक्त डॉक्टर करत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांच्या तरुण-तडफदार नागरिकांनाही सहभागी करुन घ्या. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, तज्ज्ञ यांच्या टास्क फोर्स तयार करा, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या (Narendra Modi message at video conference with Chief Ministers)

हेही वाचा : लॉकडाऊनची मुदत वाढणार नाही, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, तासाभरात ट्वीट डिलीट

5. लोकप्रियता मिळवण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करु नका. हा लढा गांभीर्याने घ्यायाचा आहे. सर्व राज्यांमध्ये या दृष्टीने समन्वय हवा. दोन-चार दिवस मीडियामध्ये प्रसिद्धीही मिळेल, पण ‘कोरोना’चे संकट प्रत्यक्षात खूप मोठे आहे, हे लक्षात ठेवा

7. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल, त्यामुळे गर्दी उसळेल. ग्रामीण भागात असे होऊ देऊ नका. योग्य विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी एक वाहन ठरवल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दीही टाळता येईल.

8. पंतप्रधान गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होत आहे, ती न होऊ देण्यासाठी नीट नियोजन करा

9. केंद्र सरकारने राज्यांना द्यायाचा 11 हजार कोटींचे योगदान आम्ही तात्काळ देत आहोत. आयुष मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिलेले उपाय जरुर करा.

10. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘कोरोना’मुळे मोठ्या प्रमाणावर बळी जातील, अशी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्येही कोरोना संसर्ग आढळत आहे. आपणही काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान असेल.

(Narendra Modi message at video conference with Chief Ministers)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.