AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Speech : ‘स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला…’ लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींचं महत्त्वाचं विधान

Independence Day: आज देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.

Narendra Modi Speech : 'स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला...' लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींचं महत्त्वाचं विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून संबोधन
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 15, 2022 | 10:50 AM
Share

नवी दिल्ली : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. “स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद वाटतोय. शिवाय ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

भारत लोकशाहीची जननी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे. मी देशाचा पंतप्रधान म्हणून बोलतोय. पण मी या देशातील जनतेचं दु:ख: जानतो. मी जितंक तुमच्याकडून शिकलोय तितकंच मी तुम्हाला ओळखतोय. तुमच्या सुख-दु:ख शी मी परिचीत आहे. ते दु:ख दूर करण्यासाठी मी कायम प्रयत्नसील करेन. त्यासाठी मी संपूर्ण वेळ द्यायला तयार आहे. शेवटच्या माणसाला फायदा व्हावा, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. मी माझे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आहे, असंही मोदी म्हणालेत.

महापुरुषांची आठवण

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे.देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे,असंही मोदी म्हणालेत.

‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल