मोदी म्हणाले, ‘भारतात तुमची भावकी शोधलीय, पुरावेही आणलेत’, बायडन यांच्या उत्तराने हास्यकल्लोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची शुक्रवारी पहिल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान भेट झाली. या बैठकीत दोघांचाही मिश्किल अंदाज सगळ्या जगाला पाहायला मिळाला.

मोदी म्हणाले, 'भारतात तुमची भावकी शोधलीय, पुरावेही आणलेत', बायडन यांच्या उत्तराने हास्यकल्लोळ
पंतप्रधान मोदी आणि जो बायडन
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 8:53 AM

PM Modi Visit US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची शुक्रवारी पहिल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान भेट झाली. या बैठकीत दोघांचाही मिश्किल अंदाज सगळ्या जगाला पाहायला मिळाला. तुमच्या बायडन या आडनावाचे लोक भारतात देखील राहायला आहेत, असं मिश्किलपणे मोदी बायडन यांना म्हणाले. त्यावर ते आमचे पाहुणे आहेत काय?, असं बायडन यांनी मोदींना विचारताच क्षणाचाही विलंब न लावता ‘होय’ असं उत्तर मोदींनी दिलं. तसंच त्याच्या संबंधित कागदपत्रे देखील मी सोबत आणली आहेत, असं मोदी बायडन यांना हसत हसत म्हणाले. दोन्ही नेत्यांनी व्हाईट हाऊसमध्ये या विषयावर मजेदार पद्धतीने चर्चा केली.

भारतात राहणाऱ्या बायडन आडनाव असलेल्या लोकांशी संबंधित कागदपत्रे आणली आहेत, असं जेव्हा मोदी बायडन यांना म्हणाले तेव्हा बायडन यांनी मोदींना थेट सवाल केला की, ‘माझा त्यांच्याशी संबंध आहे का?’ यावर पंतप्रधान मोदींनी ‘होय, तुमचा संबंध आहे’ असं उत्तर दिलं. “राष्ट्रपतीजी, तुम्ही आज भारतातील बायडन आडनावाबद्दल विस्तृतपणे माझ्याशई चर्चा केलीत. याआधीही केली होती. तुमच्या उल्लेखानंतर मी काही कागदपत्रे शोधली. आज मी अशीच काही कागदपत्रे तुम्हाला दाखविण्यासाठी सोबत आणली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिल्या भेटीत संभाव्य ‘इंडिया कनेक्शन’ बद्दल मिश्किल अंदाजात चर्चा केली. बायडन ‘आडनाव’ असलेल्या एका व्यक्तीबद्दलच्या घटनेची आठवण सांगताना ते म्हणाले, जेव्हा मी 1972 मध्ये पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आलो तेव्हा मला एका बायडन नावाच्या व्यक्तीने पत्र लिहिले. बायडन यांनी 2013 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती असताना मुंबईत आल्याची आठवण सांगताना त्यावेळी त्यांना भारतात तुमचे कुणी नातेवाईक आहेत का?, असा कुणीतरी प्रश्न विचारल्याचं देखील सांगितलं.

मोदी आणि बायडन यांचा मिश्किल अंदाज

जो बायडन यांनी सांगितलं, ‘मी म्हणालो की मला याबद्दल खात्री नाही, पण जेव्हा मी वयाच्या 29 व्या वर्षी 1972 मध्ये पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मला’ बायडन ‘आडनाव असलेल्या व्यक्तीकडून मुंबईतून एक पत्र मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी काही पत्रकारांनी त्यांना सांगितलं की भारतात पाच बायडन आडनावाचे लोक राहतात.

गमतीने बायडन यांनी सांगितलं, “ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक कॅप्टन जॉर्ज बायडन होते. जे आयरिश माणसाला स्वीकारणे कठीण होते. मला आशा आहे की तुम्ही हे सगळं विनोदाने घेताय . तो बहुधा तिथेच राहिला आणि एका भारतीय महिलेशी त्याने लग्न केले”

‘मी त्यांचा कधी पत्ता शोधू शकलो नाही, त्यामुळे या बैठकीचा संपूर्ण उद्देश मला तो प्रश्न सोडवण्यास मदत करणे आहे.’ ‘पंतप्रधान मोदींसह हॉलमध्ये उपस्थित सभागृह बायडन यांच्या उत्तरानंतर हास्यात दंगून गेलं.

हे ही वाचा :

Narendra Modi Joe Biden Meeting : नरेंद्र मोदींनी घेतली जो बायडेन यांची भेट, दोन बलाढ्य नेत्यांमध्ये बैठक, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

PM Modi US Visit Second Day: जो बायडन भेट, क्वाड देशांच्या बैठकीत हजेरी, असा असेल मोदींचा अमेरिकेतील दुसरा दिवस!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.