पृथ्वीवर येणार मोठं संकट; महाकालेश्वर मंदिरातून मिळाले संकेत?
उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. दररोज लाखो भक्त बाबा महाकालेश्वर यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला येत असतात. हे मंदिर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. दररोज लाखो भक्त बाबा महाकालेश्वर यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला येत असतात. या मंदिराबाबत अनेक मान्यता आहेत. ज्याची प्रचिती वेळोवेळी बाबा महाकालेश्वर यांच्या भक्तांना येते. दरम्यान महाकालेश्वर मंदिरातमध्ये अशी एक घटना घडली आहे, ज्या घटनेनंतर भक्तांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या घटनेची वेगवेगळ्या संदर्भानं चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे ते?
वादळामुळे महाकालेश्वर मंदिराच्या कळसावर लावलेला सोन्याचा ध्वज कोसळला आहे. या घटनेनंतर काहीतरी अघटीत घडणार असल्याची चर्चा सध्या बाबा महाकालेश्वर यांच्या भक्तांमध्ये सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडल्याचं सांगितलं जातं आहे. चांगली गोष्ट म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र या घटनेनंतर आता मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दरम्यान सध्या हा ध्वज पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. दरम्यान मंदिरावरील ध्वज कोसळणं हा अशुभ संकेत असल्याचा दावा पुजाऱ्याकडून करण्यात आला आहे, मात्र बाबा महाकालेश्वर यांची त्यांच्या भक्तांवर कृपा असल्यानं काहीही होणार नाही असंही या पुजाऱ्यानं म्हटलं आहे.
ध्वज कधी खाली पडला?
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची आहे. उज्जैनमध्ये मोठं वादळ आलं होतं. हवेचा वेग प्रचंड होता, हवेमुळे हा ध्वज कोसळला आहे. आधीच हा ध्वज ढिल्ला झालेला असावा, त्यामुळे हवेमुळे हा ध्वज खाली कोसळल्याचं बोललं जात आहे. महाकालेश्वर मंदिरावर असलेला हा ध्वज शेकडो वर्षांपासून भक्ती आणि परंपरेचं प्रतिक आहे, मात्र दोन दिवसांपूर्वी शहरात वादळ आलं होतं, या वादळात हा सोन्याचा ध्वज खाली कोसळला. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झालेली नाहीये. जेव्हा ही घटना घडली तेव्हा शेकडो भक्त मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते, ध्वज खाली कोसळल्यानंतर तातडीनं मंदिर प्रशासनानं मंदिराचा हा भाग रिकामा केला, आता पुन्हा एकदा या ध्वजाच्या उभारणीचं काम सुरू आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
