Ram Mandir : राम मंदिर बनला ‘कुबेराचा खजाना’, नोटा मोजून थकले बँकेचे कर्मचारी

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर बनला 'कुबेराचा खजाना', नोटा मोजण्याची संपूर्ण प्रक्रिया होते सीसीटीव्हीत कैद, दिवसातून इतक्या वेळा रिकामी केली जाता दान पेटी..., 11 दिवसांमध्ये प्रभू राम यांच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांचा दान जमा

Ram Mandir : राम मंदिर बनला 'कुबेराचा खजाना', नोटा मोजून थकले बँकेचे कर्मचारी
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 11:16 AM

मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या थाटात आणि उत्साहात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येत प्रभू राम यांचं मंदिर झाल्यानंतर दररोज लाखे भक्त प्रभू राम यांचे दर्शन घेण्यासाठी रामनगरीत दाखल होतात. आतापर्यंत असंख्या लोकांनी रंगेत उभं राहून प्रभू राम यांचे दर्शन घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसाला तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक भक्त रामनगरीत दाखल होतात. प्रभू राम यांचं दर्शन झाल्यानंतर भरभरुन दान देखील करतात. राम मंदिर आता कुबेराचा खजाना बनला आहे… असं म्हणायला हरकत नाही.

राम मंदिर ट्रस्टचे डॉक्टर अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसाला तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक भक्त प्रभू राम यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. एवढंच नाही तर, तीन फेब्रुवारी पर्यंत जवळपास 28 लाख भक्तांनी प्रभू राम यांचं दर्शन घेतलं आहे. शिवाय दान पेटीत जमा झालेली रक्कम देखील फार मोठी आहे.

प्रभू राम मंदिर यांच्या दान पेटीत भक्त रोकड, चेकच्या माध्यमातून दान करतात. भाविकांची वाढती संख्या पाहाता राम मंदिर ट्रस्ट त्यांना विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. रामललांचे दर्शन घेण्यासाठी जेवढा वेळ भाविक रांगेत उभे असतात, तेवढाच वेळ आपल्या कमाईतील काही भाग मंदिरात दान करण्यासाठीही घेत आहेत. असा दावा राम मंदिर ट्रस्टचे सदस्य करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिरात गेल्या 11 दिवसांत 20 कोटी रुपये दान आलं आहे. केवळ रक्कम आणि रोख रकमेतूनच नाही तर मौल्यवान धातूही रामलालला दान केले जात आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, प्रभू राम विराजमान झाल्यापासून सुमारे 28 लाख राम भक्तांनी पूजा केली आहे.

सांगायचं झालं तर, प्रभू राम यांच्या गर्भगृहासमोर मोठ्या आकाराच्या चार दान पेट्या आहेत. ज्यामध्ये भक्त दान करतात. दान पेट्या दिवसातून दोन वेळा रिकाम्या केल्या जातात. आलेले दान मोजण्यासाठी 11 कर्मचारी कार्यरत आहेत. बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टच्या तीन कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.

दान पेट्यांमध्ये आलेलं दान मोजून झाल्यानंतर रोज संध्याकाळी राम मंदिर ट्रस्ट कार्यालयात दानमध्ये आलेले पैसे जमा केले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हाच्या कैदेत होते.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.