AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राशन कार्ड धरणासाठी खुशखबर, ऑक्टोबर महिन्यात मोदी सरकार देणार ही विशेष सुविधा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. याचा फायदा तब्बल 80 कोटी लोकांना होणार आहे.

राशन कार्ड धरणासाठी खुशखबर, ऑक्टोबर महिन्यात मोदी सरकार देणार ही विशेष सुविधा
शिधा पत्रिका Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 28, 2022 | 11:49 AM
Share

मुंबई,  जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची (Latest Information) आहे. वास्तविक, ही योजना एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती नंतर मार्च 2022 मध्ये ही योजना सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेशी (Pradhanmantri Garib Kalyan Yojna) तब्बल 80 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. आकडेवारीनुसार या योजनेचे लाभार्थी मोठ्याप्रमाणात आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा मोफत रेशन वितरणाची ही सर्वात मोठी योजना सहा महिन्यांनी म्हणजेच  मार्च 2023 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याब करण्यात आलेली नाही.

योजनेवर खर्च झाले आतापर्यंत 3.40 लाख कोटी

अधिकाऱ्यांच्या मते, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे. यासाठी सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. यासाठी सरकारकडून स्टॉकच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे.  सरकारने आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये या योजनेवर खर्च केले आहेत. सरकारने योजेच्या कालावधीत वाढ केल्यामुळे लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

योजने अंतर्गत लाभ

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील सर्व गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत कुटुंबाला एक किलो हरभरा डाळ आणि आवश्यक मसाल्यांचे एक किट देण्यात आले. पूर्वी ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांसाठी होती. नंतर त्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांना देखील जोडण्यात आले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.