AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडी, स्पर्म, बलात्कार आणि व्हिडीओ क्लिप्स… अखेर माजी खासदाराला जन्मठेप; काय होतं प्रकरण?

मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायालयाने त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

साडी, स्पर्म, बलात्कार आणि व्हिडीओ क्लिप्स... अखेर माजी खासदाराला जन्मठेप; काय होतं प्रकरण?
prajwal-revanna case
| Updated on: Aug 02, 2025 | 5:02 PM
Share

मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी रेवण्णा यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विशेष न्यायालयाने रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(के) आणि 376(2)(एन) अंतर्गत ही शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेसह रेवण्णा यांना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडितेला 7 लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. ही शिक्षा आजपासून लागू झाली आहे.

साडी, स्पर्म, बलात्कार आणि व्हिडीओ क्लिप्स…

प्रज्वल रेवण्णाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महत्त्वाचा पुरावा म्हणून एक साडी न्यायालयात सादर करण्यात आली होती. तसे रेवण्णा यांनी मोलकरणीवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता. तसेच तिच्याकडे जी साडी होती, त्या साडीवर तपासादरम्यान स्पर्म आढळले होते. त्यामुळे रेवण्णा यांच्याविरोधात सबळ पुरावा मिळाला आणि गुन्हा सिद्ध झाला.

123 पुरावे मिळाले

म्हैसूरमधील केआर नगर मध्ये ही घटना घडली होती. मोलकरणीच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच्या तपासात सीआयडीच्या विशेष तपास पथकाने सुमारे 2000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, तसेच तपासादरम्यान अधिकाऱ्यांना एकूण 123 पुरावे मिळाले होते. त्यामुळे आता मोलकरणीच्या बाजूने हा निकाल लागला आहे.

सात महिन्यांत निकाल

या प्रकरणाचा तपास सीआयडी निरीक्षक शोभा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. 31 डिसेंबर 2024 रोजी या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. त्यावेळी न्यायालयाने 23 साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता. हे जबाब आणि अधिकाऱ्यांना मिळालेले पुरावे यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी आता अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे आता रेवण्णा यांना दंड भरावा लागणार आहे, तसेच त्यांची रवानगी जेलमध्ये होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.