एआय इम्पॅक्ट समीट 2026 ची तयारी, पीएम मोदी यांची 12 इंडियन AI स्टार्टअपसोबत बैठक, सांगितल्या योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 इंडियन एआय स्टार्टअप सोबत बैठक घेतली आहे.त्यात भारतात ग्लोबल एआय लीडर तयार करण्यावर जोर देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी इंडीयन AI स्टार्टअपसोबत राऊंडटेबल मीटींगची अध्यक्ष स्थान भूषवले. पुढच्या महिन्यात भारतात एआय इम्पॅक्ट समीट 2026 भरणार आहे. यात परिषदेत 12 इंडियन AI स्टार्टअप्सनी ‘AI फॉर ALL: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’ साठी क्वालीफाय केले आहे. पीएम मोदी यांनी या स्टार्टअप्ससोबत राऊंड टेबल बैठक घेत त्यांच्या सोबत चर्चा केली आहे.
हे एआय स्टार्टअप अनेक क्षेत्रात काम करत आहेत. ज्यात इंडियन लँग्वेज फाऊंडेशन मॉडेल, मल्टीलिंगुअल LLM,स्पीच-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-ऑडिओ आणि टेक्स्ट-टू-व्हिडीओ; ई-कॉमर्स, मार्केटिंग आणि पर्सनलाईज्ड कंटेट तयार करण्यासाठी जेनरेटिव्ह एआयचा वापर करुन 3D कंटेंट, इंडस्ट्रीजमध्ये डाटा-ड्रिव्हन डिसीजन, मेकिंगसाठी इंजिनिअरिंग सिम्युलेशन, मटेरियल रिसर्च आणि एडव्हान्स एनालिटिक्स; हेल्थकेअर डायग्नोस्टिक्स आणि मेडिकल रिसर्च वगैरेचा समावेश आहे.
एआय स्टार्टअपने देशात आर्टीफिशियल इंटेलिजन्स इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मजबूत दृढ वचनबद्धतेची प्रशंसा केली. त्यांनी एआय सेक्टरचे वेगाने वाढ आणि भविष्यातील मोठ्या शक्यतांवर जोर दिला.
AI सेक्टरमधील ग्रोथ आणि इतर शक्यतांवर चर्चा
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स इन्होवेशन आणि डिप्लॉयमेंटचे केंद्र बिंदू भारताकडे शिफ्ट होत आहे. एआय स्टार्टअपच्या प्रतिनिधींनी सांगितले की भारतात आता एआय डेव्हलपमेंटसाठी एक मजबूत आणि चांगले वातावरण मिळत आहे, ज्यामुळे देश ग्लोबल एआय मॅपवर मजबूतीने समोर आले आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की समाजात बदल येण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या महत्वावर जोर दिला आहे. त्यांनी सांगितले की भारत पुढच्या महिन्यात एआय इम्पॅक्ट समीटचे यजमान पद भूषवत आहे. ज्याद्वारे देश टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठी भूमिका बजावेल. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की भारत एआयचा वापर करुन बदल करण्याचा प्रयत्न करत आहे.
भविष्याचे को-आर्किटेक्ट आहे AI Entrepreneur
स्टार्टअप्स आणि एआय Entrepreneur भारताच्या भविष्याचे को-आर्किटेक्ट आहे आणि देशात इन्व्होवेशन आणि मोठ्या प्रमाणात इम्प्लीमेंटेशन दोन्हींसाठी खूप जास्त क्षमता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत जगाच्यासमोर एक अनोखा एआय मॉडेल सादर करायला हवे ते मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्डच्या भावनेला दर्शवते असेही मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की भारत जगातील भरवसा देशाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी या गोष्टींवर जोर दिला की भारतीय एआय मॉडेल नैतिक, निष्पक्ष, पारदर्शी आणि डेटा प्रायव्हसी सिद्धांवर आधारित असेल. ते म्हणाले की स्टार्टअप्सने भारतातून ग्लोबल लीडरशिपच्या दिशेने देखील काम करणे गरजेचे आहे. ते म्हणाले की भारत जगभरात किफायती दरात एआय, सर्वसमावेशी एआय आणि किफायती इन्व्होवेशनला प्रोत्साहन देऊ शकते.
AI मध्ये स्थानीय आणि स्वदेशी कंटेंटला प्रोत्साहन
मोदी यांनी हा देखील सल्ला दिला की भारतीय एआय मॉडेल वेगळे असावे आणि त्यांना स्थानिक आणि स्वदेशी कंटेन्ट आणि क्षेत्रिय भाषांना प्रोत्सोहन मिळाले पाहिजे.
या बैठकीत अवतार, भारतझेन, फ्रॅक्टल,गण,झेनलूप, ज्ञानी, इंटेली हेल्थ, सर्वम, शोध एआ, सोकेट एआ, टेक महिंद्रा आमि झेनटेक सहित भारतीय एआय स्टार्टअपचे सीईओ, प्रमुख आणि प्रतिनिधी सामील झाले. बैठकी दरम्याने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री जितीन प्रसाद देखील उपस्थित होते.
