गोव्यात मंदिरात होत असलेल्या लग्नाला राष्ट्रपतींची सरप्राईज विझिट, नवविवाहितांना आशीर्वाद

गोव्याच्या लेबरेशन डे कार्यक्रमात (Goa Liberation Day) सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती हे शनिवारी गोव्यात पोहोचले.

गोव्यात मंदिरात होत असलेल्या लग्नाला राष्ट्रपतींची सरप्राईज विझिट, नवविवाहितांना आशीर्वाद
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 8:14 AM

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रविवारी गोव्याच्या प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात (President Ramnath Kovind Blesses Bride And Groom) दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी मंदिरात एक लग्न पार पडत होतं. हे बघून राष्ट्रपती आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. आपल्या लग्नात राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाहून नववधू आणि नवरदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला (President Ramnath Kovind Blesses Bride And Groom).

गोव्याच्या लेबरेशन डे कार्यक्रमात (Goa Liberation Day) सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती हे शनिवारी गोव्यात पोहोचले. दोन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी त्यांनी गोव्याच्या राजधानीपासून तब्बल 16 किलोमीटर दूर असलेल्या मर्दोल (Mardol) येथील प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात जावून दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राष्ट्रपती मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा तिथे एका जोडप्याचं लग्न होत होतं. त्यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना जावून आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतींसोबत असलेले राज्यपाल आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी देखील जोडप्याला आशीर्वाद दिले. इतके मोठे पाहूणे आपल्या लग्नात आल्याचं पाहून कुटुंबं आणि पाहूणे आवाक झाले. याबाबत राष्ट्रपती भवनकडून ट्वीटही करण्यात आलं. “असं क्वचितच होतं की एका मंदिरात राष्ट्रपती यांचा कार्यक्रम आणि कुठला ल्गन सोहळासोबत पार पडेल, पण असं झाले जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांनी महालसा मंदिरचा दौरा केला. यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला आणि ते क्षण त्यांच्यासाठी आणखी खास बनला.” (President Ramnath Kovind Blesses Bride And Groom)

महालसा नारायणी मंदिर (Mahalasa Narayani Temple) गोव्याच्या मर्दोल शहरात वसलेले देवी महालसा समर्पित हिंदू मंदिर आहे येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

समान नागरी संहिता स्वीकारल्याबाबत राष्ट्रपतींकडून कौतुक

पोर्तुगीज राजवटीपासून स्वतंत्र होवून गोव्याला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती कोविंद शनिवारी अनेक उत्सवात सहभागी होण्यासाठी गोव्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्यात लागू झालेल्या समान नागरी संहितेचं (Uniform Civil Code) कौतुक केलं.

गोव्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी नागरिकांना समान नागरिक संहितेला स्वीकारलं आहे. यामुळे गोव्यातील सांस्कृतिक विविधतेला चालना मिळेल (President Ramnath Kovind Blesses Bride And Groom).

सबंधित बातम्या :

Special report | पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले का होतात?, अमित शाह काय म्हणाले?

Ayodhya Dhannipur Masjid: 30 किमी अंतराने संपला 28 वर्षांचा संघर्ष, हा ‘विविधतेत एकता’ असलेला भारत

अयोध्येत होत असलेली मशिद कशी आहे ? वाचनालय, रूग्णालय आणि बरंच काही, स्पेशल रिपोर्ट

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.