पंतप्रधान मोदी यांचे दोन सर्वात विश्वासू IAS अधिकारी, एकाची सोलर मॅन म्हणून ओळख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या नेत्यांना स्थान मिळाले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना देखील कायम ठेवले आहे. मोदींचे सर्वाता विश्वासू अधिकारी पुन्हा एकदा नव्याने नियुक्त करण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक जुने मंत्री आहेत जे कायम ठेवण्यात आले आहेत. पण या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खास अधिकाऱ्यांची देखील पुन्हा नेमणूक केली आहे. तिसऱ्या कार्यकाळातही त्यांनी आपल्या त्या मोजक्याच विश्वासू व्यक्तींवर विश्वास दाखवला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सलग तिसऱ्यांदा NSA करण्यात आले आहे. पीके मिश्रा यांची पुन्हा एकदा प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण पीके मिश्रा आणि अजित डोवाल यांच्याशिवाय आणखी दोन अधिकारी आहेत, जे मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याचा अनेकांची इच्छा असेल पण सगळ्यांनाच ती संधी मिळत नाही. पंतप्रधान मोदींनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. ज्यामध्ये तरुण कपूर आणि अमित खरे यांचा देखील समावेश आहे. पुढील 2 वर्षांसाठी पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. देशातील चारा घोटाळा उघडकीस आणण्याचे श्रेय अमित खरे यांना जाते. तर तरुण कपूर हे संपूर्ण देशात सोलर मॅन म्हणून ओळखले जातात.
कोण आहेत अमित खरे?
पंतप्रधान मोदींचे सल्लागार असलेले अमित खरे यांनी १९७७ साली रांची येथील एका केंद्रीय शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. ते त्या वर्षी तो त्यांच्या शाळेत टॉपर देखील राहिले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयआयएम अहमदाबादमध्ये त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर ते 1985 मध्ये ते आयएएस अधिकारी झाले. अमित खरे यांची प्रतिमा गंभीर अधिकारी अशी आहे. चारा घोटाळा उघडकीस आणण्यात अमित खरे यांचा मोठा वाटा होता. चारा घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव तुरुंगात जावे लागले आहे. अमित खरे यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयातही काम केले आहे.
कोण आहे तरुण कपूर
तरुण कपूर हे देखील पंतप्रधान मोदींचे विश्वासू अधिकारी आहेत. केंद्राने आणलेल्या पीएम सूर्या मोफत वीज योजनेतही तरुण कपूर यांचे मोठे योगदान आहे. तरुण कपूर नेहमीच वादांपासून दूर राहिले आहेत. ते 1987 बॅचचे IAS असून ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये कार्यरत होते. तरुण कपूर यांनी दिल्ली जल बोर्ड आणि पेट्रोलियम मंत्रालयातही काम केले आहे. आता पुन्हा ते पीएम मोदींचे सल्लागार बनले आहेत.
