AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांनी 45 तासांच्या साधनेनंतर देशवासियांसाठी लिहिली चिठ्ठी, म्हटले, राजकीय वाद विवाद, वार- पलटवार, आरोप…

Prime Minister Narendra Modi letter: विरक्ती, शांतता आणि शांततेच्या त्या वातावरणात, माझ्या मनात भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारताच्या ध्येयांसाठी सतत विचार येत होते. कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवीन उंची दिली. सागराच्या विशालतेने माझ्या विचारांचा विस्तार झाला.

नरेंद्र मोदी यांनी 45 तासांच्या साधनेनंतर देशवासियांसाठी लिहिली चिठ्ठी, म्हटले, राजकीय वाद विवाद, वार- पलटवार, आरोप...
साधनेनंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिली चिठ्ठी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 03, 2024 | 12:01 PM
Share

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी येणार आहे. त्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी 45 तासांची साधना करुन परतले आले. कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जून रोजी त्यांचे 45 तासांचे धान्य पूर्ण झाले. दिल्लीला परत येताच पुन्हा काम सुरु केले. कन्याकुमारीवरुन दिल्लीला परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी चिठ्ठी लिहिली. ही चिठ्ठी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

काय आहे त्या चिठ्ठीत

निवडणुकीच्या रणधुमाळीतून शांतता मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपले अनुभव कथन केले. साधनेचे अनुभव कथन करताना त्यांनी ध्यान्याचा सुरुवातीचा काळ कसा होता अन् शेवट कसा होतो, ते सांगितले. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ध्यान सुरु केल्यानंतर निवडणुकीचा प्रचार डोक्यात गुंजत होता. निवडणुकी दरम्यान माता, बहिणी आणि बेटी यांचे मिळालेले प्रेम, आशीर्वाद, त्यांच्या डोळ्यात माझ्यासंदर्भात असलेला विश्वास सर्व काही आत्मसात होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते, मी शून्यामध्ये जात होतो. साधनेत प्रवेश करत होतो. त्यानंतर काही क्षणात राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप, स्वर अन् शब्द सर्व काही शून्यात समावत होते. माझ्या मनात विरक्तीची भावना तीव्र होत होती. माझे मन बाह्य जगतापासून पूर्णपणे अलिप्त होत होते.

भारताच्या ध्येयांसाठी सतत विचार

विरक्ती, शांतता आणि शांततेच्या त्या वातावरणात, माझ्या मनात भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारताच्या ध्येयांसाठी सतत विचार येत होते. कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवीन उंची दिली. सागराच्या विशालतेने माझ्या विचारांचा विस्तार झाला. क्षितिजाच्या विस्ताराने ब्रह्मांडच्या खोलवर असलेल्या एकतेची अनुभूती मला आली. हिमालयाच्या कुशीत अनेक दशकांपूर्वी केलेले विचार आणि अनुभव पुन्हा जिवंत होत आहेत, असे वाटत होते.

लक्ष्य आता दूर नाही, चला वेगान जाऊ या…

आपल्या चिठ्ठीत नरेंद्र मोदी शेवटी म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये म्हटले होते की पुढील 50 वर्ष केवळ अन् केवळ राष्ट्रासाठी समर्पित करावे लागणार आहे. त्या आव्हानाच्या बरोबर 50 वर्षांनी 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला. आज आपल्याकडे तोच सुवर्णक्षण आहे. यामुळे पुढील 25 वर्ष केवळ अन् केवळ राष्ट्रासाठी समर्पित करा. आमच्या या प्रयत्नांनी येणारी पिढी, येणारे शतक समृद्ध भारताचा मजबूत पाया बनतील. देशातील उर्जा पाहिल्यावर मी म्हणू शकतो, लक्ष्य आता दूर नाही, चला वेगान जाऊ या… भारताला विकसित बनवू या…

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा