कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या विधानाने वातावरण पुन्हा तापले, थेट..
कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या विधानावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आल्यात.

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात उभे केले. या आंदोलनाला यश मिळाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या आंदोलनादरम्यान राजीनामा द्यावा लागला. मोठा फटका मोदी सरकारला बसला. सुरूवातीला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा टाळण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून करण्यात आले. मात्र, देशभरात विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरिता रस्त्यावर उतरले. आंदोलन अधिक तीव्र होताना दिसले. ज्यानंतर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. मोदी सरकारमधील हा पहिला राजीनामा ठरला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले. यासोबतच त्यानंतर महत्वाची बैठक कॉकरोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. या बैठकीनंतर कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केले की, आम्ही राजकारणात सध्याच जाणार नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमचा लढा कायम सुरू असेल.
आता कॉकरोच जनता पार्टीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्सल शब्दाचा प्रयोग केला. यावरूनच आता कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली. कॉकरोच जनता पार्टीकडून आरोप करण्यात आला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांबद्दलच हा शब्द वापरल्याचे त्यांनी म्हटले. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते साैरभ दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावरून हल्लाबोल केला.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, वाह… भारतातील प्रमुख असलेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रश्न विचारणाऱ्या युवा पिढीला थेट दिमागी नक्सल म्हटले गेले. हे कोणत्याही पंतप्रधानांकडून केल्या जाणाऱ्या धक्कादायक विधानांपैकी एक आहे. तेही शिक्षण दिनानिमित्त. यादरम्यान दास यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे तर यावेळी ते SRCC च्या मुद्द्यावरही बोलू शकले असते.पुढे दास यांनी म्हटले की, यावेळी नरेंद्र मोदी यांनी युवकांना निशाणा बनवले.
त्यांना ते अधिक महत्वाचे वाटले. जे सत्तेत असलेल्या लोकांना प्रश्न विचारतात.युवकांना नरेंद्र मोदी यांनी नवीन आशा दिली पाहिजे पण ते दिमागी नक्सल म्हणत आहेत. मूर्खासारखे हे बोलणे आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाच्या भाषणातही दिमागी नक्शली हा शब्द वापरला होता. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आशुतोष रांका यांनीही टीका केली.
