Video: सभेला उशीर झाला तर तुम्ही काय कराल? प्रियंका गांधींनी काय केलं ते बघा!

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा या सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी प्रचारसभांचा आणि आसाममधील नागरिकांच्या भेटींचा सपाटाच लावलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:48 PM, 2 Mar 2021
Video: सभेला उशीर झाला तर तुम्ही काय कराल? प्रियंका गांधींनी काय केलं ते बघा!

दिसपूर : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा या सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी प्रचारसभांचा आणि आसाममधील नागरिकांच्या भेटींचा सपाटाच लावलाय. एकाच दिवसात अनेक ठिकाणी उपस्थित राहावे लागत असल्याने त्या बरिच धावपळ करतानाही दिसत आहेत. असाच एक प्रसंग आजच्या आसाममधील सभेत पाहायला मिळाला. सभेला उशीर झाल्याने अचानक प्रियंका गांधींनी थेट धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या सोबत असणारे नेते आणि सुरक्षा रक्षकांचीही ऐनवेळी तारांबळ उडाली. त्यांनाही प्रियंका गांधींसोबत धावावं लागलं (Priyanka Gandhi run due to late in Election rally in Tezpur Assam).

प्रियंका गांधी आज (2 मार्च) आसाममधील तेजपूरमधील रॅलीसाठी आल्या. यावेळी निश्चित वेळेप्रमाणे पोहचण्यास त्यांना उशीर झाला. त्यामुळे त्यांनी प्रचारसभेच्या मैदानावर पोहचल्यानंतर पायी चालत असताना अचानक धावण्यास सुरुवात केली. यावेळी सभेच्या ठिकाणी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. प्रियंका गांधींच्या सभेला मोठ्या प्रमाणात आसामचे नागरिक उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचंही प्रमाण मोठं होतं. प्रियंका गांधी येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.

काँग्रेसचं सरकार आल्यास CAA लागू होणार नाही, 200 यूनिट मोफत वीज : प्रियंका गांधी

या सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार निवडून आल्यास आसाममध्ये CAA (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) लागू होणार नाही. तसेच सर्वसामान्यांना 200 यूनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, अशी घोषणा प्रियंका गांधींनी केली.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “आसाममध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास आमचं सरकार एक नवा असा कायदा मंजूर करेल ज्यामुळे आसाममध्ये सीएए कायदा लागू होणार नाही. काँग्रेसचं सरकार आल्यास आसाममध्ये कमीत कमी 5 लाख सरकारी नोकऱ्या देऊ. गृहिणींच्या सन्मानासाठी दरमहा 2000 रुपये देऊ. चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना 365 रुपये प्रतिदिन वेतन देऊ. तसेच प्रत्येक घराला 200 यूनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. त्यामुळे महिन्याला तुमचे वीजेच्या बिलापोटी खर्च होणारे जवळपास 1400 रुपये बचत होईल.”

हेही वाचा :

प्रियांका गांधींचं ‘मिशन आसाम’; आदिवासी नृत्यावर धरला ताल

तेव्हा तो दिवस ‘अच्छा दिन’ म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

‘डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से…’, दिशा रवीच्या अटकेचा निषेध, प्रियांका गांधी सरकारवर बरसल्या

व्हिडीओ पाहा :

Priyanka Gandhi run due to late in Election rally in Tezpur Assam