शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘व्हिटामिन ए’ची कमतरता भरून काढणाऱ्या विदेशी रताळ्याच्या पिकाने मिळेल दुप्पट उत्त्पन्न!

हे रताळे केवळ खाणाऱ्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्‍यांच्या आर्थिक आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘व्हिटामिन ए’ची कमतरता भरून काढणाऱ्या विदेशी रताळ्याच्या पिकाने मिळेल दुप्पट उत्त्पन्न!
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 4:30 PM

मुंबई : संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेमध्ये (FAO) मुख्य तांत्रिक सल्लागार असलेले प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रा. रामचेत चौधरी (Ramchet Chaudhary) यांनी भारतात ‘रताळ्या’च्या एका विदेशी प्रजातीचा शोध लावला आहे. हे रताळे केवळ खाणाऱ्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्‍यांच्या आर्थिक आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे. या रताळ्यात (Sweet Potato) गाजरापेक्षा तीनपट तर, पपईपेक्षा दुप्पट ‘व्हिटामिन ए’ आहे. म्हणूनच हे औषधी रताळे दुप्पट किंमतीला विकले जात आहे. देशात प्रथमच, अहमदाबादची एक कंपनी या रताळ्यापासून ‘चिप्स’ बनवणार आहे. डॉक्टरांच्या मते, सुमारे 60 टक्के मुलांना ‘व्हिटामिन ए’ची कमतरता असते. ज्यामुळे मुलांमध्ये आजारपण आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे हे रताळे शारीरिक, मानसिक विकास आणि डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे (Professor Ramchet Chaudhary invent new variety of sweet potato which will help to increase vitamin a and Farmers income also).

थेट नैरोबीहून व्हिटामिनयुक्त रताळ्याचे भारतात आगमन…

टीव्ही 9 डॉटकॉमशी बोलताना प्रा. चौधरी (Ramchet Chaudhary) यांनी या रताळ्याला भारतात आणण्याचे कारण सांगितले. त्यांच्या मते भारतीय रताळ्यात कार्बोहायड्रेट अधिक असतात. तर, व्हिटामिनचे प्रमाण कमी असते. पुढे चौधरी म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वी मी संयुक्त राष्ट्रांच्यावतीने युगांडाला गेलो होतो. तिथून नैरोबीला गेले. जिथे ‘व्हिटामिन ए’युक्त हे रताळे आढळले. भारताय लोकांमध्ये विशेषत: मुलांमध्ये ‘व्हिटामिन ए’ची प्रचंड कमतरता आहे. अशा परिस्थितीत या रताळ्याचे उत्पादन भारतातही व्हावे असे मला वाटले.’

100हून अधिक प्रजाती मागवल्या, परंतु टिकल्या फक्त तीन…

“’2008मध्ये तेथील वैज्ञानिक सहकार्‍यांच्या मदतीने, 100 प्रकारची रताळी मागवली होती. परंतु, त्यापैकी बहुतेक प्रजाती या आपल्या इथल्या वातावरणात वाढू शकल्या नाहीत. यापैकी उत्पादनाची शक्यता असणाऱ्या पहिल्या 10 प्रजातींची निवड केली गेली. मग यासगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना पटवून देण्याचे आव्हान होते. यासाठी आम्ही यूपीमधील संत कबीर नगर जिल्ह्यातील खैरगड, चपरा पूर्व आणि गोरखपूर जिल्ह्यातील भभया गावात या रताळ्याची (Sweet Potato) शेती सुरु केली. या शेतीत तीन प्रजाती (VA-43, ST-14 और CIP-440127) लावण्यात आल्या आहेत. ज्या एकरी 80 ते 100 क्विंटल उत्पन्न देतात. यासाठी आम्हाला इथले हवामान योग्य वाटले’, असे प्रा. चौधरी म्हणाले.

सध्या 300 शेतकरी घेतात पीक

प्रा. चौधरी म्हणाल की, ‘सध्या पूर्वांचलमधील 300 शेतकरी या रताळ्याची शेती करत आहेत. बहुतेक शेतकरी यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे प्रभावित झाले आहेत. सामान्य रताळ्याची किंमत साधारणत: 15 रुपये किलो असते, तर या रताळ्याची किंमत 25 रुपयांपेक्षा जास्त आहे. यातून जवळपास दुप्पट किंमत मिळते. कारण, हे रताळे सध्या ‘औषधी रताळे’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. म्हणूनच, याचे उत्पादन खाणाऱ्याचे आरोग्य आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न या दोन्ही गोष्टी वाढवण्यास उपयुक्त ठरेल.’ (Professor Ramchet Chaudhary invent new variety of sweet potato which will help to increase vitamin a and Farmers income also)

‘व्हिटामिन ए’च्या कमतरतेमुळे होणारे नुकसान

डॉक्टर डॉ. सुरेंद्र दत्ता यांच्या मते, ‘व्हिटामिन-ए’च्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित आजार होतात. ज्यामध्ये रातांधाळेपणा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागावरील डाग या समस्यांचा समावेश आहे. व्हिटामिन एच्या कमतरतेमुळे मानसिक विकास कमी होतो. जर, गर्भवती महिलेमध्ये ‘व्हिटामिन ए’ची कमतरता असेल तर, मूल जन्मतःच अंध असू शकते. व्हिटामिन ए त्वचा, केस, नखे, ग्रंथी, दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. याच्या अभावामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. ‘व्हिटामिन ए’ हे पपई, गाजर, गाय आणि शेळीचे दूध, हिरव्या भाज्या आणि पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये आढळते. मात्र, आता ‘व्हिटामिन ए’ या रताळ्यामध्येही मुबलक प्रमाणात आढळेल.

पूर्वांचलमधील मुलांमध्ये ‘व्हिटामिन ए’ची कमतरता

प्रा. रामचेत चौधरी (Ramchet Chaudhary) यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी पूर्वांचलमध्ये बरीच मुले अतिसारामुळे मृत्यूमुखी पडत होती. त्यावेळी बीआरडी मेडिकल कॉलेज गोरखपूरच्या डॉक्टरांना असे आढळले की, अतिसार ग्रस्त असलेल्या ज्या मुलांमध्ये व्हिटामिन एची कमतरता आहे, अशा मुलांवर अँटीबायोटीक्स काम करत नाहीत. तर, पूर्वांचलमधील 40.9 टक्के मुलांमध्ये ‘व्हिटामिन ए’ कमतरता असल्याचे, एका सर्वेक्षणात आढळले आहे.

PRDFने केलेल्या सर्वेक्षणात संत कबीर नगरमधील खैरगड, चपरा पूर्वी, धनघटा आणि गोरखपूरमधील भभया, बेलघाट आणि रामनगर करजहां येथील या सरकारी प्राथमिक शाळांमधील 60 ते 65 टक्के मुलांमध्ये ‘व्हिटामिन-ए’ची कमतरता असल्याचे दिसून आले. या सरकारी शाळांमध्ये मुख्यतः गरीब कुटुंबातील मुले शिकतात, ज्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होत नाही. हीच कमतरता भरून काढण्यासाठी हे रताळे एक स्वस्त आणि चांगला पर्याय ठरणार आहे.

(Professor Ramchet Chaudhary invent new variety of sweet potato which will help to increase vitamin a and Farmers income also)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.