AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतील मालमत्तेचे दर गगनाला भिडले, कवडीमोल जमिनीचे भाव आता इतक्या पटीने वाढले

Ayodhya property rates : अयोध्येला पुन्हा एकदा मोठे महत्त्व आलं आहे. राम मंदिर जवळपास बनून तयार झाले आहे. राम मंदिरात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार असून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. पर्यटनाच्या बाबतीत ऐतिहासिक महत्त्व आल्यानंतर आता येथील मालमत्तेचे भाव गगनाला भिडले आहेत.

अयोध्येतील मालमत्तेचे दर गगनाला भिडले, कवडीमोल जमिनीचे भाव आता इतक्या पटीने वाढले
| Updated on: Jan 15, 2024 | 7:19 PM
Share

अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ही प्राणप्रतिष्ठा पार पडणार असून या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील हजर राहणार आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी पाहुणे येण्याची अपेक्षा आहे. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनात तेजी येणार आहे. त्यामुळे आता अयोध्येतील मालमत्ता दरावर थेट परिणाम झाला आहे. ज्या जमिनीचे भाव आधी कवडीमोल होते. आता मात्र मोठ्या मोठ्या कंपन्या आणि बिल्डर्स अयोध्येत जमीन खरेदी करण्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार आहेत. अयोध्येतील जागेचे भाव आता गगनाला भिडले आहेत.

जमिनीचे भाव 10 पटीने वाढले

अयोध्येचे वाढते महत्त्व पाहून व्यावसायिकांना अयोध्येत जमीन खरेदी करायची आहे. रिअल इस्टेट जाणकरांनी सांगितले की, अयोध्येत अनेक ठिकाणी मालमत्तांच्या किमती 4 ते 10 पटीने वाढल्या आहेत. अयोध्येत लोकं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक अनिवासी भारतीयांना देखील येथे घर खरेदी करण्याची इच्छा आहे.

2019 मध्ये राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तेव्हापासून येथील मालमत्तेचे दर वाढण्यास सुरु झाले होते. अयोध्येतील मालमत्तेच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या होत्या. फैजाबाद रोडवरील मालमत्तेची किंमत 400 ते 700 रुपये प्रति चौरस फूट होती. त्याच वेळी, शहरामध्ये हा दर प्रति चौरस फूट रुपये 1000 ते 2000 रुपये प्रति चौरस फूट होता. ऑक्टोबर 2023 च्या संशोधनानुसार, अयोध्येच्या बाहेरील भागात 1500 ते 3000 रुपये प्रति चौरस फूट दराने जमीन उपलब्ध होती. तर, शहरात हा दर प्रति चौरस फूट ४ हजार ते ६ हजार रुपये होता.

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

२२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा सोहळा पार पड़णार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मोठी लोकं उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये क्रिकेटर, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. कार्यक्रमासाठी जवळपास सात हजार लोकं उपस्थित राहणार आहे.

स्थानिक लोकांना रोजगार

अयोध्या आता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाणी बनले आहे. त्यामुळे येथे दररोज हजारो लोकं येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.