Bhagwant Mann : विवाहबंधनात अडकले भगवंत मान आणि गुरप्रीत कौर; खास फोटो अन् पोस्ट होतायत व्हायरल

गुरप्रीत कौर या भगवंत मान यांच्या जीवनसाथी आता झाल्या आहेत. मात्र या दोघांचे लग्न ठरल्यापासून गुरप्रीत यांच्याबद्दल गुगलवर सर्च केले जात आहे.

Bhagwant Mann : विवाहबंधनात अडकले भगवंत मान आणि गुरप्रीत कौर; खास फोटो अन् पोस्ट होतायत व्हायरल
विवाह सोहळ्यादरम्यान भगवंत मान आणि गुरप्रीत कौर
प्रदीप गरड

|

Jul 07, 2022 | 1:06 PM

चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही लग्नबंधनात अडकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) कुटुंबासह या लग्नाला हजर होते. त्यांनी लग्नात वडिलांचे विधी पार पाडले. लग्नात मर्यादित पाहुणे बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 32 वर्षीय गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) या भगवंत मान (वय 48) यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली. भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. 2015मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. डॉ. गुरप्रीत कौर यांचे कुटुंब सध्या पंजाबमध्ये राहत असले तरी तिचे वडिलोपार्जित निवासस्थान हरयाणातील कुरुक्षेत्र येथे आहे.

kejriwal 1

फोटो शेअर अन् व्हायरल

गुरप्रीत कौर यांच्या बहिणीचे लग्नही राजकीय कुटुंबात झाले आहे. माजी कॅबिनेट मंत्री जसविंदर सिंग संधू यांच्या मुलाशी तिचा विवाह झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील इतर काही लोकही राजकारणाशी संबंधित आहेत. दरम्यान, लग्नाच्या विधींमध्ये गुरप्रीत कौर यांनी ट्विटरवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. निळ्या रंगाच्या सूटमधील गुरप्रीत कौर यांच्या सौंदर्याला तोडच नाही. गुरप्रीत कौर यांच्या नववधूच्या चेहऱ्यावरची चमक आणि उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. गुरप्रीत यांनी या सुंदर फोटोसोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे, की दिन शगना दा चढया…

हे सुद्धा वाचा

गुगलवर सर्च वाढले

गुरप्रीत कौर यांचा हा फोटो पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. गुरप्रीत कौर या भगवंत मान यांच्या जीवनसाथी आता झाल्या आहेत. मात्र या दोघांचे लग्न ठरल्यापासून गुरप्रीत यांच्याबद्दल गुगलवर सर्च केले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, गुरप्रीत भगवंत मान यांच्या कॉमेडीच्या फॅन आहेत. भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नाचा मेनू व्हायरल होत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हे लग्न अगदी गुपित ठेवले. भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाच्या बातम्या लग्नाच्या 1 दिवस आधी समोर आल्या. या लग्नाला अत्यंत मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले. तर लग्नातील शाही मेन्यूची देखील चर्चा सुरू आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें