गावात 100 टक्के लसीकरण झाल्यास 10 लाख रुपये बक्षीस! कोणत्या राज्याचा निर्णय?

कोरोना लसीची भीती दूर करण्यासाठी आणि गावांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने कोरोना मुक्त पिंड अभियानही सुरु केलं आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारसह सर्वच राज्य सरकारांनी लसीकरणावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. पण नागरिकांनी लस घ्यावी यासाठी सरकारकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे. लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी पंजाब सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना 10 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलीय. त्याचबरोबर कोरोना लसीची भीती दूर करण्यासाठी आणि गावांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने कोरोना मुक्त पिंड अभियानही सुरु केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या गावात नेतृत्व करण्याचं आवाहन केलंय. (A reward of Rs 10 lakh for 100 percent vaccination in the village, Punjab government decision)

लोकांमध्ये कोरोनाची सर्वसाधारण लक्षणं दिसून आली तर कोरोना चाचणी आणि लसीकरणासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जावं, असं आवाहन अमरिंदरसिंग यांनी केलंय. तसंच कोरोना उपचारासाठी सरकारने पंचायत फंडातून रोज 5 हजार ते अधिकाधिक 50 ङजार रुपये वापरण्याचीही परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेला कोरोनाच्या दुष्परिणांबाबत जागृत करण्याची गरज आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लक्षण दिसून आल्यास लवकरात लवकर कोरोना चाचणी आणि उपचार करण्याबाबत विशेष जनजागृती अभियानाची गरज असल्याचंही कॅप्टन म्हणाले. ग्रामपंतायतींच्या अखत्यारित विशेष तपास शिबिरांचं आयोजन केलं जावं. त्यात माजी सैनिकांचाही समावेश केला जावा अशी सूचनाही अमरिंदरसिंग यांनी केलीय.

कोरोना रुग्णांना वेशीबाहेर रोखा

गावांमध्ये कोरोना रुग्ण येऊ नये यासाठी पहारा देण्याचा सल्ला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कोरोना रुग्णांची योग्य तपासणी करुन त्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांच्यावर योग्य उपचार केले जावेत असंही त्यांनी म्हटलंय. ग्रामीण भागात एखाद्या नागरिकाला कोरोनाची लक्षणं दिसून येत असतील तर त्याने स्वत: क्वारंटाईन झालं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा पुढे गंभीर परिणाम घेऊन येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला दिलाय.

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना कानमंत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींनी जनतेला बेड्स आणि इतर आवश्यक गोष्टींची योग्य माहिती देण्याच्या आणि औषधांचा काळाबाजार रोखण्याच्या सूचना केल्या. जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, याचं भान ठेवून काम करा, असंही मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. मोदी यांनी आज जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. त्यामुळे लोकांना त्रास आणखी त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना योग्य आणि अचूक माहिती द्या. रुग्णालयात किती बेड आहेत. त्यातील किती रिकामे आहेत. औषधांचा पुरवठा किती आहे, याची माहिती लोकांना द्या, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याची 12 लक्षणे, सरकारने जारी केलेली यादी वाचा एका क्लिकवर

Corona Vaccine : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला लसीकरणासाठी 9 महिने थांबावं लागणार? जाणून घ्या

A reward of Rs 10 lakh for 100 percent vaccination in the village, Punjab government decision