AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीटसारखा पेपर फोडला नाही पण परीक्षेत थेट घुसखोरी, श्वेता तिवारी कॉकरोचना सांगते पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या ते नेमकं प्रकरण काय?

Punjab pharmacy examination cheating case : पंजाब फार्मेसी परीक्षेतील फसवणुवकीचं प्रकरण नेमकं काय आहे? नीट सारखा पेपर फुटला नाही. पण हा घोटाळा काय आहे? श्वेता तिवारी कॉकरोचना सांगते आता पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा पण राजीनामा घ्या ते नेमकं प्रकरण काय?

नीटसारखा पेपर फोडला नाही पण परीक्षेत थेट घुसखोरी, श्वेता तिवारी कॉकरोचना सांगते पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या ते नेमकं प्रकरण काय?
Harjot Singh Bains-Shweta Tiwari
| Updated on: Jul 27, 2026 | 12:32 PM
Share

दोन दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांना हा राजीनामा द्यावा लागला. आता यानंतर हरजोत सिंह बैंस यांचं नाव चर्चेत आहे. पंजाबच्या आप सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेले हरजोत सिंह बैंस यांनी स्वत:च पाय उतार होण्याची तयारी दर्शवलेली. अभिनेत्री श्वेता तिवारीने हाच मुद्दा उपस्थित करताना कॉकरोच जनता पार्टीवर निशाणा साधला. आता तुम्ही पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला कधी जाणार? असा प्रश्न तिने विचारला आहे. फार्मेसी परीक्षेतील हे फसवणुवकीचं प्रकरण आहे.

पंजाबच्या बाब फरीद विद्यापीठात फार्मेसी अधिकारी भरती परीक्षा झाली. त्यावेळी 19 जुलै 2026 रोजी फार्मेसी परीक्षेत हा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. साधारणत: कुठल्याही परीक्षेत घोटाळा होतो, तेव्हा पेपर आधी फुटतो, प्रश्नपत्रिकेची चोरी होते. पण पंजाबच्या फार्मेसी परीक्षेत पेपर सुरु असताना थेट घुसखोरी करण्यात आली. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

लाइव्ह ब्रिच म्हणजे हा स्कॅम नक्की काय आहे?

स्टेप 1 : ही फार्मेसी परीक्षा पंजाबच्या ज्या-ज्या केंद्रांवर झाली, फरीदकोट, कोतकापूरा आणि फिरोझपूर. तिथल्या परीक्षा केंद्राच्या आतमध्ये परीक्षार्थी एक स्मार्ट पेन घेऊन गेलेले. त्यावर मायक्रो कॅमेरा लावलेला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर काही मिनिटात परीक्षार्थींनी कॅमेऱ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि WhatsApp च्या माध्यमातून फोटो बाहेर पाठवला.

स्टेप 2 : परीक्षाकेंद्रांच्या बाहेर असलेल्या हँडलर्सना WhatsApp च्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचे फोटो मिळाले. फरीदकोट येथील एका घरातून कंट्रोल रुम बनवण्यात आलेली. तिथून सर्व ऑपरेट होत होतं. गुरमीत सिंग या सगळ्या स्कॅमचा मास्टरमाइंड आहे. हा पेपर सोडवण्यासाठी भिवानी आणि हरियाणा येथे एक्सपर्ट आधीपासूनच बसवलेले. त्यांच्यापर्यंत हा पेपर पोहोचवण्यात आला.

स्टेप 3 : ऑबजेकटिव स्वरुपात ते प्रश्न असायचे. एक्सपर्ट्सनी लगेच त्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर लाइव सेल्युलर किंवा रेडिओ लिंक आत बसलेल्या उमेदवाराकडे असायची. कानात, पगडीत असलेल्या अत्यंत स्क्षूम मायक्रो ब्लूटूथद्वारे ती उत्तर परीक्षार्थीला मिळायची.

पोलिसांनी काय कारवाई केली?

पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 35 जणांना ताब्यात घेतलं आहे. यंत्रणांनी 27 बॅटरीवर चालणारी वायरलेस स्क्षूम उपकरणं जप्त केली आहेत. यात स्पाय पेन, सीम कार्ड्स आणि 3.5 लाख ते 13 लाखापर्यंतचे चेक आहेत. याच प्रकरणात आता भाजप आणि श्वेता तिवारीने हरजोत सिंह बैंस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आप त्यांचा बचाव करत आहे. “जर, माझ्या राजीनाम्यान शिक्षण व्यवस्था सुधारणार असेल, तर मी लगेच तयार आहे” असं बैंस म्हणाले.

Follow Us
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा