AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddhu Moosewala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येची सुपारी एक कोटींची, प्रत्येक शार्प शूटरला मिळाले 5 लाख, हत्येच्या दिवशी गा़डीत 10 लाख रुपयांची कॅश

मुसावाला याची हत्या झाली त्यादिवशी हल्लेखोरांच्या गाडीत 10 लाखांची कॅश होती. ही कॅश कॅनाडात बसलेल्या लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने पाठवलेली होती. शार्प शूटर प्रियवर्त फौजी आणि कशिश यांच्या पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

Siddhu Moosewala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येची सुपारी एक कोटींची, प्रत्येक शार्प शूटरला मिळाले 5 लाख, हत्येच्या दिवशी गा़डीत 10 लाख रुपयांची कॅश
एक कोटींची सुपारीImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 10:34 PM
Share

चंदीगड – प्रसिद्ध पंजाबी गायक (Punjabi Singer)सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala Murder case)याच्या हत्येची सुपारी एक कोटी (one crore rupees)रुपयांना देण्यात आली होती. यात प्रत्येत शार्प शूटरला पाच-पाच लाख रुपये देण्यात आले. इतर पैसे बाहेरुन मदत करणाऱ्यांना देण्यात आले. मुसावाला याची हत्या झाली त्यादिवशी हल्लेखोरांच्या गाडीत 10 लाखांची कॅश होती. ही कॅश कॅनाडात बसलेल्या लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने पाठवलेली होती. शार्प शूटर प्रियवर्त फौजी आणि कशिश यांच्या पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. आता हे पैसे एकत्र करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

पंजाब-हरियाणा सीमेवर हत्यारांचे ट्रेनिंग

मुसेवाला याच्या हत्येसाठी परदेशातील हत्यारांचा वापर करण्यात आला. यात ऑस्ट्रियाच्या ग्लॉक पिस्तूल, जर्मनीची हेकलर एन्ड कोच पी -30  हँडगन, स्टार पिस्तूल, तुर्कीतील जिगाना सेमी ऑटोमेटिक पिस्तूल आणि एके 47 रायफलचा समावेश होता. ही हत्यारे चालवण्यापूर्वी प्रियवर्त फौजी आणि अंकिता सरेसा यांनी याचे ट्रेनिंग घेतले होते.

जेलमध्ये मन्नूला मारहाण झाली होती, त्यानेच पहिली गोळी मारली

मोहाचा रहिवासी असलेला शार्प शूटर मनुप्रित मनु सुस्सा काही काळापूर्वी जेलमध्ये गेला होता. तिथे त्याला मारहाण झाली होती. बंबीहा गँगने ही मारहाण केल्याचा त्याला संशय होता. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांचा नीकटवर्तीय अशी मन्नूची ओळख आहे. तो बँबीहा गँगचा बदला घेण्याच्या तयारीत होता. त्यामुळे गोल्डी ब्रारने सगळ्या शूटर्सना सांगितले होते की पहिली गोळी मनु मारेल. त्यामुळे त्याच्याकडे एके 47 रायफल देण्यात आली होती. त्याच्याच गोळीने मुसेवालाचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या मुसेवाला याच्याकडे सुरक्षा नसताना, त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

29 मे रोजी झाली होती हत्या

सिद्धू मुसेवाला याची पंजाबमध्ये मनसा येथे गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी प्रियवर्त फौजी, अंकित सेरसा आणि कुलदीप उर्फ कशीश या तिघांना अटक केली आहे. तर पंजाब पोलिसांनी या प्रकरणात रेकी करणारे, मदत करणारे आणि गाडी आणि फरार करणाऱ्या १४ जणांना अटक केली आहे. तसेच महाराष्ट्रातूनही दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या मृत्यूने पंजाबातील राजकारण आणि गुन्हेगारी विश्व ढवळून निघाले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.