AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टस्कर हत्तींच्या नेत्याला लावणार ‘रेडिओ कॉलर’, मानवी वस्तीवरील हल्ला रोखण्यासाठी केला उपाय

मानवी आणि प्राण्यांचा संघर्ष ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. वन्यप्राणी मानवी वस्तीवर हल्ले करीत असतात. आता हत्तींच्या एका कळपाने दररोजचा धुडगुस घालणे सुरु केल्याने त्यांच्या नेत्याच्या गळ्याला रेडीओ कॉलर आयडी लावण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

टस्कर हत्तींच्या नेत्याला लावणार 'रेडिओ कॉलर', मानवी वस्तीवरील हल्ला रोखण्यासाठी केला उपाय
| Updated on: Nov 28, 2024 | 1:13 PM
Share

मानवी वस्तीत प्राण्यांच्या येण्यामुळे शेतीचे नुकसान होत असते. कोकणात देखील शेजारील कर्नाटकातील हत्तींचा उपद्रव होत असतो. हरिद्वार येथील राजाजी टायगर रिझर्व्ह येथील ११ हत्तींचा कळप रोज हरिद्वारच्या मानवी वस्तीत येऊन धुडघुस घालत आहे. या हत्तींच्या कळपाचा नेता ‘अल्फा’ दररोज सतरा किमीचे अंतर कापत मानवी वस्तीत घुसखोरी करीत आहे.त्यामुळे आता या रोजच्या त्रासाला कंटाळून अल्फा या हत्तीच्या नेत्याला रेडीओ कॉलर लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

हरिद्वारच्या शहरी विभागात हत्तीचा रोजचा धुडगुस सुरु आहे. हे हत्ती वन विभागाचा पहारा असूनही आरामात तो भेदत शहरात घुसखोरी करीत ऊसाचे मळे फस्त करीत आहेत. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या हत्तींची ओळख पटवण्यात वनविभागाला यश आले आहे.यावर रेडीओ कॉलर लावण्याचा उपाय वनविभागाने करण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे हत्तीची घुसखोरी रोकली जाणार आहे.

वनविभागाच्या माहीतीनुसार राजाजी टायगर रिझर्व्हमधून अकरा हत्ती जवळपास रोज हरिद्वारच्या नागरी वस्तीत घुसखोरी करीत आहेत. या हत्तीचे नेतृत्व ‘अल्फा’ नावाचा टस्कर हत्ती करीत आहे. अल्फा हत्तीला जंगल आणि शहरादरम्यानचे सतरा किमीचे अंतरातील रस्त्या ओळखीचा झालेला आहे.त्यामुळे वनविभागाची रात्रीची गस्त असूनही हा अल्फा हत्ती आपल्या कळपाला आरामात शहरातून ऊसाच्या शेतांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी होत असतो. त्यामुळे हत्तीची घुसखोरी रोखण्यासाठी अल्फाच्या हालचालींवर नजर ठेवण्याचा उपाय सुचविण्यात आला आहे. या रणनितीनुसार अल्फाच्या गळ्यात रेडीओ कॉलर लावण्याचा निर्णय झाला आहे.त्यामुळे या हत्तींचा माग वेळेत लागून त्यांना पुन्हा जंगलात हुसकावून लावणे सोपे होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे हत्तींचा उपद्रव कमी होईल अशी आशा आहे.

हळूहळू संख्या वाढली

वनविभागाने मोठे संशोधन करुन हत्तीच्या कळपाचा प्रमुख कोण आहे हे शोधून काढले आहे. ‘अल्फा’ हाच सर्व हत्तींचे नेतृत्व करीत असून शहरातील ऊसाचा फडशा पाडण्यासाठी कोणत्या हत्तींची निवड करायची याचा निर्णय देखील तोच घेतो असे उघडकीस आले आहे.यामुळे हत्तीत संघर्ष देखील होत आहे. वनविभागाच्या माहीतीनुसार सुरुवातीला या कळपात केवळ पाच-सहा हत्ती होते. परंतू आता त्यांची संख्या अकरा झाली आहे.कळपात अल्फाच्या आवडत्या दोन्ही हत्तीणी देखील आहेत. 11 हत्तींची ओळख पटली आहे. आता त्यांच्या लीडरला कॉलर आयडी लावण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या सर्व क्षेत्रातील पहारा वाढविण्यात आला आहे. तसेच हत्तींच्या प्रादुर्भाव असलेल्या विभागातील नागरिकांना सावध रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.