AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या प्रेमात त्यांच्याकडून हाताच्या… राघव चढ्ढा यांनी थेट एक्स गर्लफ्रेंडचे उदाहरण देत..

आम आदमी पार्टीकडून राघव चड्ढा यांच्यावर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर निवडणूक आयोगात आम आदमी पार्टीने धाव घेतली. यावर आता जोरदार टीका करताना राघव चड्ढा दिसले आहेत. थेट उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले.

माझ्या प्रेमात त्यांच्याकडून हाताच्या... राघव चढ्ढा यांनी थेट एक्स गर्लफ्रेंडचे उदाहरण देत..
Raghav Chadha
| Updated on: Sep 11, 2026 | 9:50 AM
Share

पंजाबमधील मतदान यादीच्या मुद्द्यावर राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी आपला पूर्वीचा पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या मतदार यादीत आपले नाव कसे समाविष्ट झाले, यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्यांनी थेट म्हटले की, हा पक्ष माझ्या एक्स प्रेयसीसारखा वागत आहे. जुन्या गोष्टी विसरणे त्यांना शक्यच होत नाहीत. ते पुढे जातच नाहीत. आपकडून आपल्याबद्दल सातत्याने बोलले जात असल्याचा मुद्द्यावर राघव चड्ढा यांनी हा टोला लगावला. राघव चड्ढा यांनी म्हटले की, माझ्या आणि माझ्या मताबाबत बोलायचे तर आम आदमी पक्ष अशा अवस्थेत पोहोचला आहे की, मी त्यांना रात्री स्वप्नात एखाद्या भूतासारखा दिसू लागलो आहे.

दिवस रात्र ते फक्त राघव चढ्ढा, राघव चढ्ढा, राघव चढ्ढा, राघव चढ्ढा याच गोष्टी करत आहेत. आम आदमी पार्टी ही एखाद्या एक्स प्रेयसीसारखी आहे, जिचा प्रियकर आता पुढे निघून गेला आहे आणि आपलं आयुष्य जगत आहे. तरीही ती मात्र पूर्णपणे त्याच्याच विचारांत मग्न आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करत आहे आणि त्याला विसरू शकत नाहीये, असे थेट विधान करत राघव चड्ढा याने मोठा टोला लगावला.

आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. पुढे राघव चड्ढा यांनी म्हटले की, मला खरोखरच त्यांच्याबद्दल मनापासून काळजी वाटते. मला भीती वाटते की, ब्रेकअप झाल्यानंतर एखाद्या प्रेयसीसारखे विरहात व्याकुळ होऊन कदाचित ते स्वत:च्या हाताची नस कापून घेईल. त्यामुळे मला खरोखर चिंता वाटते.

दिल्लीच्या मतदार यादीत त्याचे नाव ज्या प्रक्रियेद्वारे समाविष्ट करण्यात आले, त्याबाबत स्पष्टीकरण मिळावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. त्यानंतरच राघव चढ्ढा यांनी हे विधान केले आणि जोरदार टोला लगावला. आता वाद वाढताना दिसत आहे. भाजपाकडून राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दिली जाणार आहे. त्यापूर्वीच मोठा वाद रंगताना दिसतोय.

Follow Us
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर