AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghuram Rajan Birthday : भारतीय अर्थव्यवस्थेला नवा आयाम देणारे RBI चे माजी गर्व्हनर रघुराम राजन

कठीण काळात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याचं काम केलं होतं. इतकंच नाही तर 2012-13 या काळात राजन यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहिलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन बाजूला झाल्यानंतर सध्या ते शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस इथं ज्ञानदानाचं काम करत आहेत.

Raghuram Rajan Birthday : भारतीय अर्थव्यवस्थेला नवा आयाम देणारे RBI चे माजी गर्व्हनर रघुराम राजन
रघुराम राजन
| Updated on: Feb 03, 2022 | 4:00 AM
Share

मुंबई : जागतिक स्तरावरील अर्थविश्वात ज्या व्यक्तीचं नाव आदरानं घेतलं जातं असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) माजी गर्व्हनर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांचा आज वाढदिवस. 2013 साली रघुराम राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची धुरा हाती घेतली होती. त्यावेळी रुपयाची किंमत आणि महागाई यामुळे देशातील नागरिक पुरता पिचला होता. अशा कठीण काळात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) पुन्हा उभारी देण्याचं काम केलं होतं. इतकंच नाही तर 2012-13 या काळात राजन यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहिलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन बाजूला झाल्यानंतर सध्या ते शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस इथं ज्ञानदानाचं काम करत आहेत.

रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी मध्य प्रदेशात झाला होता. त्यांचा जन्म एका तामिळ परिवार झाला. त्यांचे वडील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या रुपात भारत सरकारच्या सेवेत होते. राजन यांचं शिक्षण दिल्लीतील आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाली होती. रघुराम गोविंदा राजन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनी पदवीचं शिक्षण आयआयटी दिल्लीतून घेतलं. 1985 मध्ये आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली. तर 1987 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबात इथं पोस्ट गॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलं. इतकंच नाही तर राजन यांनी जगातील प्रतिष्ठित अशा एमआयटी विद्यापीठातून एसेज ऑफ बँकिंग या विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे.

IMF च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञाच्या रुपात काम पाहिलं

रघुराम राजन हे ऑक्टोबर 2003 ते डिसेंबर 2006 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे (IMF) मुख्य अर्थशास्त्रज्ञाच्या रुपात काम पाहिलं. असं पद भुषवणारे ते आएमएफच्या इतिहासातील सर्वाधिक तरुण आर्थिक सल्लागार होते. 2008 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांची आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्याच वर्षी राजन यांची योजना आयोगाच्या एका आर्थिक सुधारणांसंबंधी उच्च स्तरीय समितीच्या प्रमुखपदीही नियुक्ती केली. या समितीने राजन यांच्या देखरेखीत आर्थिक सुधारणांशी संबंधित आपला अहवाल पूर्ण केला.

सत्ताधाऱ्यांना सोयीचे निर्णय टाळले

आरबीआय गर्व्हनर पदाच्या कार्यकाळात राजन यांनी राजकीय निर्णय घेणं टाळलं. राजकीय फायद्यापेक्षा त्यांनी मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांचं हित जोपासलं. महागाईला आळा घालणे हाच त्यांचा प्रमुख अजेंडा राहिला. महागाईला आळा घालण्यासाठी राजन यांनी मायक्रोफायनान्शिएल बँकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यकालात व्याज दर कायम कमी राहिले, त्यामुळे महागाई हाताबाहेर गेली नाही. सत्ताधाऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्या धोरणांवर टीका केली पण राजन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं.

पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात कौशिक बसु हे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांच्या जागी रघुराम राजन यांची 10 ऑगस्ट 2012 रोजी बसु यांच्या जागी भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. 2012-13 साठी आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचं काम राजन यांनी केलं होतं. त्यावेळी 27 फेब्रुवारी 2013 ला राजन यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेला आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता.

RBI च्या सर्वात तरुण गर्व्हनरपैकी एक

त्यानंतर 6 ऑगस्ट 2013 रोजी रघुराम राजन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी नियुक्ती करण्यात आली. 4 सप्टेंबर 2013 रोजी राजन हे रिझर्व्ह बँकेचे 23 वे गर्व्हनर बनले. राजन हे देशातील सर्वात तरुण गर्व्हनरपैकी एक होते. राजन यांनी डी. सुब्बराव यांची जागा घेतली होती. राजन यांच्या नेतृत्वात चलवाढीचा दर सप्टेंबर 2013 मध्ये 9.8 टक्क्यांवरुन जुलै 2015 मध्ये 3.78 टक्क्यांवर आला होता. महत्वाची बाब म्हणजे हा आकडा 1990 नंतरचा सर्वात छोटा आकडा होता.

राजकारण प्रवेशाबाबत काय म्हणाले होते राजन?

राजन हे आरबीआयचे गर्व्हनर होते त्यावेळी त्यांच नाव देशभरात चर्चिलं जात होतं. पुढील काळात ते राजकारणात प्रवेश करतील अशीही एक शक्यता तेव्हा व्यक्त केली जात होती. राजन यांना राजकीय प्रवेशाबाबत विचारलं असता मी राजकारण गेलो तर माजी बायको मला सोडून जाईल. माझं काम हे शिकवणं आहे. मला तेच काम आवडतं, अशी प्रतिक्रिया राजन यांनी एका मुलाखतीत दिली होती.

इतर बातम्या :

घरगुती उपायांनी सोडवा सिगारेटचे व्यसन, हे रामबाण उपाय वाचा, व्यसनमुक्त व्हा

संतोष परब हल्ला ते नितेश राणेंची पोलीस कोठडी; महिनाभरात सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या

Nitesh Rane Arrest : भाजप नितेश राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे का? मुनगंटीवार म्हणतात, वेट एन्ड वॉच!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.