Rahul Gandhi: ‘हे वागणं बरं नव्हं’, राहुल गांधींच्या वर्तनावर मोठी नाराजी, माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीशांचे थेट पत्र

Rahul Gandhi in Parliament: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांच्या संसदेतील वर्तवणुकीवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. लोकसभेतील त्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त करत माजी लष्करी अधिकारी आणि निवृत्त न्यायाधीशांनी थेट पत्र लिहिले आहे.

Rahul Gandhi: हे वागणं बरं नव्हं, राहुल गांधींच्या वर्तनावर मोठी नाराजी, माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीशांचे थेट पत्र
राहुल गांधी
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 17, 2026 | 2:21 PM

Opposition Leader Rahul Gandhi: देशातील 204 माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्राचे नाव, जनतेला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि इतर खासदारांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी त्यांच्या वर्तणावर नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एस. पी. वैद्य हे या उपक्रमाचे समन्वयक आहेत. राहुल गांधी यांची वर्तणूक देशातील सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिराच्या प्रतिष्ठेला आणि घटनेच्या नैतिकतेला आव्हान देणारी आहे असे पत्रात म्हटले आहे.

या पत्रात अजून काय काय?

या पत्रानुसार, 12 मार्च रोजी संसद परिसरात विरोधी खासदारांनी, विशेषतः राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांनी जी ताकीद दिली आहे, निर्देश दिले आहेत, त्याचे उल्लंघन केले आहे. त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून चहा आणि बिस्कीटं खाल्लीत.त्यांचे हे वर्तन घटनात्मक संस्थांसाठी अनुचित आणि अत्यंत व्यवहार्य आहे.

एस पी वैद्य यांच्या मते, त्यांचे वर्तन हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही. तर लोकशाहीच्या मंदिरात त्यांचा उद्दामपणा, गर्विष्ठपणा आणि व्यक्तिगत विशेषाधिकारांचे प्रदर्शन आहे. त्यांचे वर्तन संसद कार्यप्रणाली आणि घटनात्मक व्यवहाराला बाधा आणणारे आहे.संसदेचे कामकाज व्हायला पाहिजे. पण राहुल गांधी हे मोठा वेळ वाया घालवत आहेत. त्यांचे हे वर्तन लोकशाहीच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारे आहे.

राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे

या पत्रात राहुल गांधी यांना माजी लष्करी अधिकारी आणि माजी न्यायाधीशांनी सल्लाही दिला आहे. राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी देशाची माफी मागावी. त्यांनी संसदेची प्रतिष्ठा, तिचे अधिकार आणि लोकशाही संस्था म्हणून तिचे पावित्र्य जपावे असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. लोकशाही संस्थाविषयी असलेला असा सततचा अनादर केवळ संसदेची विश्वासार्हता कमी करत नाही, तर लोकशाही जीवनाचा पायावरही आघात करणारा आहे. जनतेने राहुल गांधी यांच्या वर्तणुकीची निंदा करावी आणि लोकशाही संस्थांची सुरक्षा आणि सन्मान करावा असे आवाहन वैद्य यांनी या पत्राद्वारे केले आहे.

तर यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे सातत्याने आपल्याला सभागृहात बोलू दिल्या जात नसल्याचे आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आपला माईक बंद करण्यात येत असल्याचा आरोप करत आले आहेत. त्यांनी याप्रकरणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सुद्धा आणला होता. पण आवाजी मतदानाने तो बारगळला. आता या पत्राने राहुल गांधी यांच्या वर्तणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Follow Us