देशातील महागाई वाढली, राहुल गांधींचा मोदी सरकारविरोधात एल्गार; सायकलवर बसून संसदेत

Rahul Gandhi | दुसरीकडे अन्य विरोधकही काँग्रेसला साथ देताना दिसले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनीही सायकल चालवून मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. त्यामुळे आगामी काळात विरोधक इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

देशातील महागाई वाढली, राहुल गांधींचा मोदी सरकारविरोधात एल्गार; सायकलवर बसून संसदेत
राहुल गांधी, काँग्रेस खासदार

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीत मोदी सरकारविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले. देशातील महागाईने कळस गाठला आहे. याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसह संसदेपर्यंत सायकल मार्च काढला. यामध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, कार्ती चिदंबरम आणि गौरव गोगोई हे प्रमुख नेते सामील होते.

तर दुसरीकडे अन्य विरोधकही काँग्रेसला साथ देताना दिसले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनीही सायकल चालवून मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. त्यामुळे आगामी काळात विरोधक इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.


तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्रेक फास्टसाठी आमंत्रित केलं होतं. या ब्रेक फास्ट चर्चेला 15 पक्षाचे 100 खासदार उपस्थित राहिले होते. यात काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राजद, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, सीपीआयएम, सपीआय, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, आणि लोकजनशक्ती पार्टीच्या नेत्यांचा समावेश होता. दरम्यान या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

राहुल गांधी सक्रिय

पुढीलवर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटत असल्याचंही बोललं जात आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

आधी मोदींशी चर्चा, आता थेट अमित शाहांची भेट, शरद पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी

राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

पंतप्रधान तर आम्हाला पाणीही विचारत नाही, काँग्रेसच्या ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’ला शिवसेनेची साथ; यूपीएत सहभागी?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI