AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांना शिक्षा होणार की टळणार; या दिवशी न्यायालयाचा निर्णय येणार…

कर्नाटकमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. या प्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.

राहुल गांधी यांना शिक्षा होणार की टळणार; या दिवशी न्यायालयाचा निर्णय येणार...
| Updated on: Apr 13, 2023 | 9:01 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मानहानीप्रकरणी सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुरत सत्र न्यायालयाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. याआधी 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मोदी आडनावावरून सुरतच्या सत्र न्यायालयात राहुल गांधी यांना ठोठवलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी न्यायालय आता 20 एप्रिल रोजी आपला निकाल जाहीर करणार आहे.

या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. यापूर्वी 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुलला दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

ot

त्यानंतर तर 3 एप्रिल रोजी सुरत सत्र न्यायालयात राहुल गांधी हजरही झाले होते. त्यावेळी त्यांनी सुरत न्यायालयात मुख्य याचिका दाखल करून दोन अर्जही दाखल केले होते.

सुरतच्या सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांच्या बाजूने निकाल दिल्यास त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. ही शिक्षा रद्द करण्याचे आवाहन राहुल गांधी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जर ही शिक्षा रद्द झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली होती.

राहुल गांधी यांनाही वरच्या कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर त्यांची खासदारकी रद्दच होणार आहे. तर एवढेच नाही तर राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्यापासून त्यांना रोखले जाण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ शिक्षा झालेल्या व्यक्तीला सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी येते हा कायदा आहे. मात्र हे निर्बंध शिक्षा झाल्यानंतर लागू होतात.

त्यामुळे राहुल गांधी यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. याचा अर्थ दिलासा मिळाला नाही तर राहुल गांधी यांना 2024 आणि 2029 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या तरी त्यांच्यावर टांगती तलवार असणार आहे.

कर्नाटकमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. या प्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.

त्यानंतर सुरत येथील सत्र न्यायालयाकडून या प्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानेही त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.