AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सत्याचा अभाव, मागील वर्षात 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या’, राहुल गांधींचा घणाघात

मोदी सरकारवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, 'आता भारताचे दोन तुकडे झाले आहेत असं वाटतं. एक श्रीमंत लोकांचा भारत आहे, त्यांच्याजवळ अपार धन आणि शक्ती आहे. त्या लोकांना नोकरीची गरज नाही, पाण्याच्या कनेक्शनची गरज नाही. वीज कनेक्शनची गरज नाही. मात्र, ते लोक 'देश की धडकन' कंट्रोलमध्ये करत आहेत'.

'राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सत्याचा अभाव, मागील वर्षात 3 कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या', राहुल गांधींचा घणाघात
राहुल गांधी, खासदार, काँग्रेस
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 8:37 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत (Lok Sabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, “दुर्दैवाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या भाषणात त्या मुद्द्यांची एक मोठी यादी होते, ज्याबाबत सरकार सातत्यानं दावा करतं. राष्ट्रपतींचे अभिभाषणात ब्यूरोक्रॅटिक विचारांचा उल्लेख होता. त्यांच्या अभिभाषणात सरकारसमोर मोठीं आव्हानं असलेल्या एक दोन मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं नाही की, भारत आज विभागला गेलाय. आज भारत एक नाही तर भारताचे दोन तुकडे झाले आहेत”.

मोदी सरकारवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, ‘आता भारताचे दोन तुकडे झाले आहेत असं वाटतं. एक श्रीमंत लोकांचा भारत आहे, त्यांच्याजवळ अपार धन आणि शक्ती आहे. त्या लोकांना नोकरीची गरज नाही, पाण्याच्या कनेक्शनची गरज नाही. वीज कनेक्शनची गरज नाही. मात्र, ते लोक ‘देश की धडकन’ कंट्रोलमध्ये करत आहेत’.

‘2021 मध्ये 3 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या’

‘तुम्ही रोजगार उपलब्ध करुन देण्याची भाषा करता, 2021 मध्ये 3 कोटी युवकांची नोकरी गेली. आज भारत 50 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचा सामना करत आहे. तुम्ही मेड इन इंडिया, स्टार्ट-अप इंडियाच्या गोष्टी करता, पण युवकांना येथे केवळ बेरोजगारीच मिळाली आहे. या युवकांकडे जे काही होतं ते ही आता संपलं आहे’, अशी टीकाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलीय.

‘यूपीएने 10 वर्षात 27 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं’

राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीच्या मुद्द्यावर एकही शब्द नाही. देशभरातील युवक आज नोकरीच्या शोधात आहेत. तुमचं सरकार या युवकांना नोकरी देण्याच्या मुद्द्यावर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. यूपीए सरकारनं आपल्या 10 वर्षाच्या काळात 27 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं. हा आमचा डेटा नाही तर तथ्य आहे. तुम्ही मात्र 23 कोटी लोकांना पुन्हा एकदा गरीबीत लोटलं, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलाय.

‘मेड इन इंडिया’वरुन मोदी सरकारला टोला

सरकार मेड इन इंडियाची गोष्ट करतं, मात्र आजच्या काळात मेड इन इंडिया साकार रुप घेऊ शकत नाही. मेड इन इंडियामध्ये कोणते लोक सहभागी आहेत, हे माहिती नाही. लघू, मध्यम उद्योग, असंघटीत क्षेत्र तुम्ही एकप्रकारे संपवूनच टाकलं आहे. त्यांच्याशिवाय मेड इन इंडियाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असा टोलाही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

इतर बातम्या :

संतोष परब हल्ला ते नितेश राणेंची पोलीस कोठडी; महिनाभरात सिंधुदुर्गच्या राजकारणात नेमकं काय काय घडलं? जाणून घ्या

Nitesh Rane Arrest : भाजप नितेश राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे का? मुनगंटीवार म्हणतात, वेट एन्ड वॉच!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.