AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी

केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलाला पुरेसे पैसे देत नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे (Rahul Gandhi slams Modi Government).

कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 03, 2021 | 4:10 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलाला पुरेसे पैसे देत नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण दलांसाठी पुरेशा निधींची तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील 99 टक्के जनतेच्या हिताचा नाही तर फक्त एक टक्के नागरिक असलेल्या दहा ते पंधरा उद्योगपतींसाठी तयार करण्यात आला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर “थंडीत आमचे सैनिक तैनात आहेत आणि तुम्ही त्यांना पैसे देत नाहीत. हा कोणता राष्ट्रवाद आहे? ही कोणती राष्ट्रभक्ती आहे?” असे सवाल त्यांनी केले आहेत (Rahul Gandhi slams Modi Government).

“केंद्र सरकार देशातील 99 टक्के नागरिकांना पाठिंबा देईल. अर्थसंकल्पात या 99 टक्के शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात येतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, हा अर्थसंकल्प देशातील फक्त 1 टक्के नागरिकांसाठी आहे. हा अर्थसंकल्प फक्त श्रीमंत लोक, उद्योजकांचा आहे. कामगार, शेतकरी, मजूर, संरक्षण खातं यांच्याकडूल सर्व पैसे खेचून त्याच दहा-पंधरा लोकांचा खिशात टाकले गेले आहेत. खासगीकरणाचा फायदा त्यांनाच मिळेल”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीन भारतात शिरकार करतो. भारताची हजारो किमीच्या जमिनीवर ताबा मिळवतो. पण तुम्ही चीनला बजेटमधून संदेश देतात की, संरक्षणासाठी जास्त पैशांची तरतूद करणार नाहीत. तीन-चार हजार कोटी रुपये तुम्ही वाढवले. तुम्ही चीनला नेमका संदेश काय दिला? तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तुम्हाला जे कारयचंय ते करा. आम्ही आमच्या सेनेला पाठिंबा देणार नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आमचे जे जवान लडाखमध्ये आहेत, आमच्या वायूदलाचे पायलट जिथे आहेत, त्यांना आज काय वाटत असेल? आमच्यासमोर एवढे मोठे आव्हानं आहेत. पण आमचे सरकार सैन्यदालाला पैसे देत नाही. याशिवाय जे आमच्या दलाचे हक्काचे पैसे आहेत ते पैसे फक्त मोजक्या एक टक्क्याच्या उद्योगपती लोकांना दिले जात आहेत. यातून देशाला काही फायदा होणार नाही. जे आमच्या सैन्याला पाहिजे ते सरकारने दिलं पाहिजे”, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

“सरकारने छोट्या उद्योगधंद्यांना प्रोत्सान दिलं असतं तर अर्थव्यवस्था सुरळीत सुरु होऊ शकली असती. ते फक्त एक टक्के लोकांना पैसे देत आहेत”, असा आरोप त्यांनी केला (Rahul Gandhi slams Modi Government).

‘हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही’

“सरकार किल्लाबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरत आहेत का? शेतकरी शत्रू आहे का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे सरकारचं काम नाही. सरकारचं काम शेतकऱ्यांशी बातचित करणं आणि समस्या सोडवण्याचं आहे. हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : जगातील हुकूमशहांची नावं ‘M’वरूनच का सुरू होतात?; राहुल गांधींची खोचक टीका

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी