
Rahul Gandhi PM Kundli 2026: महाराष्ट्रात सध्या राजकीय धुराळा उठालेला आहे. नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकीत विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागेल आहे. भाजपचा वरचष्मा आहे. तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड, मगरमिठ्ठी विविध राजकीय संस्थांना पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन वर्ष आले की भविष्यात काय होणार, याची चर्चा होतेच. अशीच एक चर्चा सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेता आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देशाचे 100 टक्के पंतप्रधान होणार असा दावा एका ज्योतिषाने केला आहे. त्यांच्या कुंडलीतच तो योग असल्याचा दावा या ज्योतिषाचा आहे. कधी होणार राहुल गांधी देशाचे पंतप्रधान? काय आहे तो दावा? जाणून घ्या.
राहुल गांधी पंतप्रधान होणार
‘राहुल गांधी पंतप्रधान होणारच’असं छातीठोकपणे ज्योतिषी मनीष अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यांनी 100 टक्केच नाही तर 110 टक्के हमी घेतली आहे. त्यांच्या मते राहुल गांधी यांच्या कुंडलीतच हा राजयोग आहे. ते भारताचे पंतप्रधान होतील हे त्यांच्या कुंडलीतच नमूद आहे. मनोज अग्रवाल यांचा दावा आहे की, राहुल गांधी 100 टक्केच नाही तर 110 टक्के देशाचे पंतप्रधान ( Rahul Gandhi become the Prime Minister) होतील. या नवीन दाव्याने अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत.
मनीष अग्रवाल यांच्या मते हा योग आताच, लागलीच नाही. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते, नेते यांना वाट पहावी लागणार आहे. त्याचे तारे हे जवळपास 10 वर्षांनी चमकतील. त्यावेळी त्यांचे पंतप्रधान होण्याचे योग समोर येत आहेत. म्हणजे 2036 मध्ये ते पंतप्रधान होतील. त्याच वर्षी त्यांच्यासाठी हा राजयोग तयार होईल. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची पहिली चुणूक दिसून येईल असा दावा पण मनीष अग्रवाल यांनी केला आहे.
अमित शाह यांची का काढली आठवण?
मनिष अग्रवाल यांनी या पॉडकॉस्टमध्ये अजून एक मोठा दावा केला आहे. त्यांच्यामते, अमित शाह यांची कुंडली अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांच्या कुंडलीत पुढील दहा वर्षे केंद्रातील सत्तेचे योग आहेत. म्हणजे पुढील 10 वर्षांत त्यांचा सत्तेतील आणि राजकारणातील दबदबा कायम राहिल. पण जसा त्यांचा प्रभाव ओसरेल. तेव्हा राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रह शड्डू ठोकतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. अग्रवाल यांच्या मते, दोन्ही नेत्यांचे राजकीय नशीब हे एकमेकांशी कुठे ना कुठे तरी संबंधित आहेत.