Delhi Capitals : दिल्ली कॅपिट्ल्स टीमची नेतृत्वाची धुरा 25 वर्षीय खेळाडूला, मेगा ऑक्शननंतर फ्रँचायजीची मोठी घोषणा
Delhi Capitals New Captain : डीसी अर्थात दिल्ली कॅपिट्ल्सने डबल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाआधी मुंबईकर बॅट्समन जेमीमाह रॉड्रिग्स हीची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. फ्रँचायजीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स फ्रँयचायजीने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीने आगामी वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या हंगामाआधी (WPL 2026) नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) फ्रँचायजीने 22 डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याचं सोशल माीडिया पोस्टद्वारे जाहीर केलं होतं. त्यानुसार दिल्ली कॅपिट्ल्सने आज 23 डिसेंबरला संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान नव्या कर्णधारांचं नाव जाहीर केलं आहे. दिल्लीने मेगा ऑक्शनआधी नियमित कर्णधार मेग लॅनिंग हीला करारमुक्त केलं होतं. त्यामुळे आगामी हंगामासाठी कॅप्टन कोण असणार? याची प्रतिक्षा चाहत्यांनी होती. त्यानुसार फ्रँचायजीने 25 वर्षीय युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. ती खेळाडू कोण आहे? जाणून घेऊयात.
मुंबईकर जेमीमाह रॉड्रिग्स दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदी
मुंबईकर जेमीमाह रॉड्रिग्स हीची दिल्ली कॅपिट्ल्स टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. जेमीलाच कर्णधारपदाची जबाबदारी मिळणार, हे निश्चित होतं. फ्रँचायजीचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी भारतीय खेळाडूलाच नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तेव्हापासूनच जेमीचं नाव आघाडीवर होतं. त्यानंतर जेमीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
जेमीमाह वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून दिल्लीसाठी खेळतेय. जेमीने दिल्लीकडून खेळताना 27 सामन्यांमध्ये 139.67 च्या स्ट्राईक रेटने एकूण 507 धावा केल्या आहेत.
जेमीमाह रॉड्रिग्ससमोरसमोर सर्वात मोठं आव्हान काय?
दिल्लीने डब्ल्यूपीएल स्पर्धेतील तिन्ही हंगामातील अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. मात्र दिल्लीला तिन्ही वेळा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे यंदा जेमीसमोर दिल्लीच्या पहिल्या ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याचं आव्हान असणार आहे.
जेमीमाह रॉड्रिग्स हीची पहिली प्रतिक्रिया काय?
Read more about it: https://t.co/Ym3OmVwtVd
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 23, 2025
दरम्यान जेमीमाहने तिची कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. तिने फ्रँचायजींच्या मालकांचे या संधीसाठी आभार मानले. तसेच जेमीने दिल्ली कॅपिट्ल्स आपल्या मनाजवळ असल्याचं म्हटलं.
“दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती केली जाणं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. नेतृत्वासाठी माझ्यावर विश्वास दाखवणारे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मी आभारी आहे. माझ्यासाठी कुटुंबियांसाठी हे वर्ष फार खास ठरलं. वर्ल्ड कप विजयानंतर आता पहिल्या हंगामापसून आपल्या मनातल्या टीमचं कर्णधारपद मिळणं हे माझ्यासाठी फार विशेष आहे”, असं स्मृतीने नमूद केलं.
