Video : मतं मिळवण्यासाठी भररस्त्यातच मुलींचे पाय धरले! मुलींची रिएक्शनही अफलातूनच, लोटांगण घालणारे उमेदवार व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एका उमेदवाराने तर तरुणीचे पाय धरले. ही तरुणी आपले पाय सोडण्यासाठी उमेदावाराला सांगतेय खरं. पण तो काही पाय सोडायला तयारच नाही. काही जण तर थेट रस्त्यावरच मतदारांसमोर आडवे झालेत.

Video : मतं मिळवण्यासाठी भररस्त्यातच मुलींचे पाय धरले! मुलींची रिएक्शनही अफलातूनच, लोटांगण घालणारे उमेदवार व्हायरल
मतदारांच्या पाया पडताना उमेदवारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:34 AM

मुंबई : मतं मिळवण्यासाठी राजकारणात (Politics in India) आश्वासनं दिली जातात. वेगवेगळ्या योजनांचे दावे केले जातात. निवडणुकीत ही गोष्ट तर होतेच. लोकांच्या गाठीभेटी घेणं, ही तर निवडणुकीआधीची (Election in India) ठरलेली गोष्ट. भाषणं करणं, रॅली काढणं, मतदारांची भेट घेण्यासाठी धडपडणं, या गोष्टी निवडणुकीआधी काही नव्या नाहीत. पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांची मतं आपल्यालाच मिळावीत यासाठी राजस्थानातील तरुणांनी जी गोष्ट केली आहे, ते भारीच आहे. चक्क मतदारांच्या पाया पडणारे उमेदवार राजस्थानात दिसून आले. याचा व्हिडीओही व्हायरल (Viral Video in Rajasthan) झाला आहे. अनसीन इंडिया नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. राजस्थानातील बारन येथील एका महाविद्यालयातील हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आलाय. या व्हिडीओत विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीदरम्यान, काही उमेदावारांनी आपल्या मतदारांसमोर थेट साष्टांग नमस्कार घालत्याचं व्हिडीओ दिसून आलंय.

ट्वीटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून इंटरनेट युजर्समध्ये चर्चांना उधाण आलंय. मतांसाठी उमेदवार मतदारांच्या पायाशी लोळणही घालायला तयार होतात, असं म्हणतात. पण इथं खरोखरंच उमेदवार मतदारांच्या हातापाया पडणं, त्यांच्यासमोर नतमस्तक होणं, साष्टांग दंडवंत घालणं हे प्रकार करताना दिसून आलेत. विशेष म्हणजे हे सगळं भरस्त्यामध्ये सुरु होतं.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

व्हायरल व्हिडीओमध्ये एका उमेदवाराने तर तरुणीचे पाय धरले. ही तरुणी आपले पाय सोडण्यासाठी उमेदावाराला सांगतेय खरं. पण तो काही पाय सोडायला तयारच नाही. काही जण तर थेट रस्त्यावरच मतदारांसमोर आडवे झालेत. काहींनी गुडघ्यावर बसून हात जोडून मतांची भीक मागितलीय. राजस्थान विश्वविद्यालयातील छात्र संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी हा प्रकार केलाय.

शु्क्रवारी 26 ऑगस्ट रोजी राजस्थानात विद्यार्थी संघटनेची निवडणूक पार पडली. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर ही निवडणूक झाली. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली होती. त्यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसमोर लोंटांगण घालणाऱ्या उमेदावारांचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.