AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy : INS सूर्य लॉन्च, स्वदेशी सपोर्ट शिपमुळे खोल समुद्रात गेम बदलणार, आता भारतीय युद्धनौका..

Indian Navy : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथे आयएनएस सूर्य लॉन्च केली. भारताची ही स्वदेशी सपोर्ट शिप आहे. यामुळे काय-काय गोष्टी बदलणार ते जाणून घ्या.

Indian Navy : INS सूर्य लॉन्च, स्वदेशी सपोर्ट शिपमुळे खोल समुद्रात गेम बदलणार, आता भारतीय युद्धनौका..
ins Surya
| Updated on: Oct 06, 2026 | 4:33 PM
Share

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 6 ऑक्टोंबर 2026 रोजी विशाखापट्टनमच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांचं उद्घाटन केलं. त्यांनी पहिली स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप FSS-1 म्हणजे INS सूर्य लॉन्च केली. अपग्रेडेड स्लिपवे-4 300 टन गोलियथ क्रेनचं उद्घाटन केलं. भारतीय नौदलाची समुद्री शक्ती वाढवण्यासह स्वेदशी जहाज निर्मिती क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. फ्लीट सपोर्ट शिप कार्यक्रमामुळे भारतीय नौदलाची सहनशक्ती, टप्पा आणि क्षमता मजबूत होईल. हिंद महासागर क्षेत्रात दीर्घकाळ समुद्री क्षेत्रात काम करण्यासाठी युद्धनौकांना रसद, देखभाल आणि निरंतर सहाय्य आवश्यक असतं.

ही जहाजं समुद्रात इंधन पुरवठा, रसद आणि अन्य मदत पोहोचवून नौदलाच्या मोहिमा दीर्घकाळ सुरु ठेवण्यासाठी मदत करतील. INS सूर्य पूर्णपणे स्वदेशी डिजाइनचं जहाज आहे. कार्गो आणि इंधन साठा, ऑनबोर्ड देखभाल वर्कशॉप, मल्टी-रोल हेलीकॉप्टरसाठी डेक आणि स्वसंरक्षण प्रणालीने सुसज्ज असलेलं जहाज आहे. स्वतंत्र भारताचं पहिलं जहाज उषाची निर्मिती 1948 साली विशाखापट्टनम येथे झाली होती, ती आठवण संरक्षण मंत्र्यांनी सांगितली. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मागच्या आठ दशकापासून देशाच्या समुद्री आणि संरक्षण गरजा ध्यानात घेऊन जहाज बांधणीचं काम करत आहे.

शिपयार्डने भारताची समुद्री ताकद वाढणार नाही

‘आत्मनिभर्रता सर्वात जास्त महत्वाची आहे . त्यानंतर जागतिक स्पर्धा पुढचं पाऊल आहे’ असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. भारतीय शिपयार्डने गुणवत्ता, खर्च, टेक्नोलॉजी, डिलीवरी आणि विश्वसनीयतेच्या आधारावर आघाडीच्या शिपयार्डशी सामना केला पाहिजे. त्यांनी विशाखापट्टनमला प्रमुख समुद्री औद्योगिक केंद्राच्या रुपात विकसित करण्याचं आवाहन केलं. नौसेना, शिपयार्ड, डीआरडीओ, उद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप यांनी मिळून काम केलं पाहिजे असं संरक्षण मंत्री म्हणाले. एकटं नौदल किंवा शिपयार्डने भारताची समुद्री ताकद वाढणार नाही.

चांगली डिझाइन बनवा, वेगाने बनवा, वेळेवर डिलीवरी करा, चांगली देखभाल करा असं संरक्षण मंत्री म्हणाले. मागच्या एकादशकात संरक्षण निर्माण तंत्रात मोठा बदल झाला आहे. देशांतर्गत डिझाइन आणि निर्मितीवर जोर वाढला आहे.

Follow Us
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?