राज्यसभेत मैं झुकेगा नहीचा ट्रेलर… शेतकर्‍याच्या मुलाला शेतमजुराच्या मुलाचे प्रत्युत्तर; अविश्वास प्रस्तावावरुन महाभारत

Rajya Sabha Jagdeep Dhankad Vs Mallikarjun Kharge : एकीकडे दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याला अटक झाली तर दुसरीकडे त्याच्या पुष्पा चित्रपटातील मैं झुकेगा नही, चा ट्रेलर राज्यसभेत दिसला. शेतकर्‍याच्या मुलाला शेतमजुराच्या मुलाने प्रत्युत्तर दिले. राज्यसभेत शुक्रवारी जोरदार महाभारत घडले.

राज्यसभेत मैं झुकेगा नहीचा ट्रेलर... शेतकर्‍याच्या मुलाला शेतमजुराच्या मुलाचे प्रत्युत्तर; अविश्वास प्रस्तावावरुन महाभारत
राज्यसभेत महाभारत
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 3:29 PM

राज्यसभेत शुक्रवारी जोरदार महाभारत घडले. एकीकडे दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या अटेकची बातमी येऊन धडकली. तर दुसरीकडे राज्यसभेत त्याच्या पुष्पा चित्रपटातील मैं झुकेगा नही च्या डॉयलॉगचा ट्रेलर उभ्या देशाने पाहीला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्या प्रस्तावानंतर आज राज्यसभेत मोठा गोंधळ उडाला. काय घडलं राज्यसभेत?

मल्लिकार्जुन खर्गे आणि धनखड यांच्यात वाद

राज्यसभेत शुक्रवारी सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की अखेर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करावे लागले. खर्गे यांनी यावेळी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला.

हे सुद्धा वाचा

मी झुकणार नाही

दोघांचे वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. यापूर्वी सुद्धा खर्गे-धनखड यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. धनखड हे घालून पाडून बोलतात. सतत अपमान करतात असा विरोधकांचा आरोप आहे. तर विरोधक नियमानुसार वागत नाहीत. मनमानीपणा करतात असा धनखड यांचा आरोप आहे. दरम्यान आज राज्यसभेत शेतकरी आणि शेतमजूर या शब्दांचा डंका दिसून आला.

तुम्ही मला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी मी झुकणार नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे धनखड म्हणाले. तर त्याला लगेचच मल्लिकार्जुन खरेग यांनी प्रत्युत्तर दिले. मी शेतमजूराचा मुलगा असल्याचा पलटवार खर्गे यांनी केला. तुम्ही पण मला दाबू शकत नाही. माझ्यावर दबाव टाकू शकत नाही, असा शा‍ब्दिक वार खर्गे यांनी धनखड यांच्यावर केला.

दोघांमध्ये 5 मिनिटांपर्यंत वाद

विरोधी पक्षनेते आणि सभापती यांच्यातील ही बाचाबाची चांगलीच गाजली. जवळपास 5 मिनिटे दोन्ही ज्येष्ठांनी एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला. या वादाची सुरुवात अविश्वास प्रस्तावावरून झाली. सभापती यांनी आपल्याविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. तो 14 दिवसानंतर सभागृहासमोर मांडण्यात येईल असे सांगीतले.

त्याचवेळी विरोधी गटातून प्रमोद तिवारी काही बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा धनखड यांनी त्यांना कायद्याचा आणि नियमांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तुम्ही लोक माझ्याविरोधात काय काय बोलता. मी सगळ ऐकत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी माझा कमकुवतपणा कधीच दाखवणार नाही. देशासाठी मी मरेल आणि मिटेल असे धनखड म्हणाले.

तुम्ही नेहमी अपमान करता

धनखड यांच्या भूमिकेवर खर्गे यांनी लागलीच पलटवार केला. तुम्ही नियमानुसार सभागृह चालवा. सत्ताधाऱ्यांना तुम्ही नेहमी झुकते माफ देता. त्यांनाच जास्त बोलू देता. ते लोक नियम तोडून बोलतात. पण तुम्ही आमचा अपमान करता, अशा आरोपाच्या फैरी त्यांनी झाडल्या. तर तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन हे बोलण्यासाठी उठले असता त्यांना धनखड यांनी चांगलेच फटकारले.

'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.