AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 हजार VIP, सर्व व्हिआयपीसाठी खास गिफ्ट

Ram Mandir : अयोध्येत भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी देश विदेशातून 11 हजार व्हिआयपींना आमंत्रण दिले आहे. त्यांच्यासाठी खास गिफ्ट आणले आहे.

Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 हजार VIP, सर्व व्हिआयपीसाठी खास गिफ्ट
| Updated on: Jan 11, 2024 | 9:44 AM
Share

अयोध्या, दि. 11 जानेवारी 2024 | अयोध्येत श्री रामांचे भव्य उभारले गेले आहे. या मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात त्याचा उत्साह सुरु आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशविदेशातून व्हीआयपी येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संत महात्मा अयोध्येत दाखल होऊ लागले आहे. राम मंदिरासाठी ज्या राम भक्तांनी संघर्ष केला, ते लोकही अयोध्येत येत आहेत. या सोहळ्याला 11,000 पेक्षा जास्त व्हिआयपी येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी राम मंदिर ट्रस्टकडून केली जात आहे. 22 जानेवारी रोजी येणाऱ्या व्हिआयपींना प्रभू राम यांच्याशी संबंधित स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. दर्शन घेतल्यानंतर त्यांना हे स्मृती चिन्ह आणि भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

काय आहेत भेटवस्तू

सनातन सेवा न्यासचे संस्थापक आणि जगद्गुरु भद्राचार्य यांचे शिष्य शिवओम मिश्रा यांनी म्हटले की, अतिथींना दोन बॉक्स दिले जाणार आहे. एका बॉक्समध्ये प्रसाद असणार आहे. हा प्रसाद गिरी गाईच्या तुपापासून केलेले बेसनचे लाडू आहे. तसेच रामानंदी प्रथेप्रमाणे लावण्यात येणारी रक्षा आहे.

दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू राम यांच्यासंदर्भातील वस्तू आहेत. राम मंदिर शिलान्यास करताना जी माती गर्भगृहातून निघाली आहे, ती एक डब्बीत दिली आहे. सोबत सरयू नदीचे पाणी आहे. एका ब्रॉसच्या ताटात हे दिले जात आहे. राम मंदिराची स्मृती म्हणून एक चांदीचे नाणे दिले जाणार आहे. या सर्व गोष्टी बॉक्समध्ये असून हे बॉक्स जुटच्या बॅगमध्ये ठेवले आहे. बॅगेवर राम मंदिराचा इतिहास आणि संघर्ष दिला गेला आहे.

अनेक महिन्यांपासून तयारी

सनातन सेवा न्यासला भेटवस्तू देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अकराहजार पेक्षा जास्त जणांना या भेटवस्तू देण्यात येणार असल्यामुळे अनेक महिन्यांपासून त्याची तयारी सुरु आहे. विविध ठिकाणी या ऑर्डर दिल्या गेल्या असून त्या बॅगा आता अयोध्येत येत आहे. या भेटवस्तूच्या माध्यमातून कायमस्वरुपी भगवान राम यांची आठवण त्यांना मिळणार आहे.

हे ही वाचा

जमीन विकली, उसनवारीने पैसे घेतले अन् राम मंदिरासाठी एक कोटी दिले, आता त्या व्यक्तीला…

ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.