अयोध्येत आज कसा असणार A to Z कार्यक्रम, पाच तास चालणार पूजाविधी

Ram Mandir 22 january program in ayodhya : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्याला देशभरातून अनेक व्हिआयपी येणार आहेत. या सोहळ्यास 50 देशांचे प्रतिनिधी असणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी असणारा A to Z कार्यक्रम...

अयोध्येत आज कसा असणार A to Z कार्यक्रम, पाच तास चालणार पूजाविधी
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 6:56 AM

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा पाच तास चालणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे. 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांना सुरुवात झाली. हे कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभास फक्त देशभरातून नाही विदेशातून आमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी 50 देशांचे प्रतिनिधी या समारंभास असणार आहे.

असा असणार कार्यक्रम

  • 10:30 AM पर्यंत प्रमुख अतिथींना आपल्या जागेवर बसावे लागणार
  • 12:20 PM ते 1 PM मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजा
  • 12:29 PM ते 12:30 PM प्राणप्रतिष्ठा
  • प्राणप्रतिष्ठेनंतर महापूजा आणि महाआरती
  • 1 PM ते 2:15 PM पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत व महंत नृत्यगोपाल दास यांचे संबोधन
  • 2.30 PM पासून 8000 आमंत्रित पाहुण्यांना दर्शन घेता येणार
  • 50 देशांमधून आलेले प्रतिनिधी रामलल्लाचे दर्शन घेणार
  • 500 कंपनी प्रतिनिधी, इंजिनिअर, कामगार आणि निर्माण कार्यात असणारे लोक दर्शन घेणार

16 जानेवारीपासून असे झाले कार्यक्रम

  • 16 जानेवारी: प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन
  • 17 जानेवारी: मूर्ती मंदिर परिसरात आणणार
  • 18 जानेवारी (संध्याकाळी): तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास
  • 19 जानेवारी (सकाळी): औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
  • 19 जानेवारी (संध्याकाळी): धान्याधिवास
  • 20 जानेवारी (सकाळी): शर्कराधिवास, फलाधिवास
  • 20 जानेवारी(संध्याकाळी): पुष्पाधिवास
  • 21 जानेवारी(सकाळी): मध्याधिवास
  • 21 जानेवारी(संध्याकाळी): शय्याधिवास

22 जानेवारी रोजीच का प्राणप्रतिष्ठा

22 जानेवारी रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग यादिवशी आहे. त्यानंतर इंद्र योग आहे. ज्योतिषांच्या मते 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली.

हे सुद्धा वाचा

हे ही आहे कारण

ज्योतिषांच्या मते 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा जन्म झाला.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.