Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला, 10 जणांचा मृत्यू; दोन दिवसांनंतर बचावकार्य थांबवलं

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला, 10 जणांचा मृत्यू; दोन दिवसांनंतर बचावकार्य थांबवलं
रामबन बोगदा दुर्घटनेतील बचावकार्य दोन दिवसांनी थांबवलं
Image Credit source: ANI

दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे काम करत असलेले काही मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. दोन दिवसानंतर जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं

सागर जोशी

|

May 22, 2022 | 12:02 AM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Shrinagar National Highway) एक निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर सुरु करण्यात आलेलं बचावकार्य शनिवारी थांबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलब्याखालून 9 मृतदेह (Dead Bodies) काढण्यात आले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे काम करत असलेले काही मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्याला (Rescue work) सुरुवात करण्यात आली. दोन दिवसानंतर जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यावेळी 10 मृतदेह मिळाल्याची माहिती रामबन उपजिल्हाधिकारी मुसर्रत इस्लाम यांनी दिली.

10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगालचे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व 10 मृतांच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. 10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगालचे असल्याची माहिती मिळतेय. तर आसामचा एकजण, नेपाळचे 2 तर दोघे स्थानिक रहिवासी होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते रुग्णालयात नेण्यात आले. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करण्यात आलाय. सर्व बेपत्ता मजुरांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी बचावकार्य थांबवण्यात आलं. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने गुरुवार आणि शुक्रवारी दिवसरात्र बचावकार्य सुरु होतं. त्यात तीन लोकांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दोन दिवस चाललं बचावकार्य

यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, रामबन जिल्ह्याच्या खूनी नाला इथं निर्माणाधीन बोगद्याचं काम सुरु होतं. त्यादरमान बोगद्याचा काही भाग कोसळला. मात्र, शनिवारी रामबनचउ उपायुक्त मुसर्रत इस्लाम यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हवाल्याने सांगितलं की काम सुरु असलेल्या भागात T4 पर्यंत भूस्खलन झालं.

बचावकार्यात इंडो-तिबेट पोलीस सहभागी झाले होते. 15 व्या बटालियन ITBP चे जवान एका स्निफर डॉगसह बचावकार्यात सहभागी झाले होते. या दुर्घटनेत मनुष्यहानीसह बुलडोझर आणि अन्य वाहनांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें