AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदेव बाबा कोरोनाची लस घेणार; म्हणाले, डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत!

अॅलिओपॅथीवर टीका करणारे योग गुरु रामदेव बाबा अखेर कोरोनाची लस घेणार आहेत. रामदेव बाबांनी थेट यू टर्न घेत डॉक्टरांची स्तुतीही केली आहे.

रामदेव बाबा कोरोनाची लस घेणार; म्हणाले, डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत!
रामदेव बाबाच्या कंपनीने केली ही कमाल, गुंतवणूकदारांना मिळवून दिला 1000 कोटींचा नफा
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 10:45 AM
Share

नवी दिल्ली: अॅलिओपॅथीवर टीका करणारे योग गुरु रामदेव बाबा अखेर कोरोनाची लस घेणार आहेत. रामदेव बाबांनी थेट यू टर्न घेत डॉक्टरांची स्तुतीही केली आहे. डॉक्टर हे पृथ्वीवरील दूत आहेत, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. (Ramdev changes his mind, says he will take COVID-19 vaccine)

कोरोना संकटावरून रामदेवबाबांनी आधी डॉक्टरांवर टीका केली होती. तसेच कोरोनाची लस घेण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचं रामदेव यांनी स्वागत केलं आहे. ऐतिहासिक निर्णय असं सांगत सर्वांनी लस घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते हरिद्वारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तर एक व्यक्तीही दगावणार नाही

लसीचे दोन्ही डोस घ्या. योग आणि आयुर्वेदामुळे तुम्हाला दुप्पट ताकद मिळेल. योग आणि आयुर्वेद संरक्षण कवच म्हणून काम करेल. त्यामुळे एकही व्यक्ती कोरोनामुळे दगावणार नाही, असं ते म्हणाले. तुम्ही लस कधी घेणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर लवकरच असं उत्तर त्यांनी दिलं.

डॉक्टरांच्या संस्थांसोबत दुश्मनी नाही

यावेळी त्यांनी डॉक्टरांची वरेमाप स्तुती केली. डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देवदूत आहेत, असं ते म्हणाले. भारतीय आरोग्य संस्थांसोबत झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. आमची कुणासोबतही दुश्मनी नाही. केवळ औषधांच्या नावावर जनतेच्या होणाऱ्या शोषणाविरोधात आपण आवाज उठवत होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं प्रकरण काय?

कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतली होती. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली होती. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ramdev changes his mind, says he will take COVID-19 vaccine)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!

आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे

सरकारच्या Fake News तपासणी करणाऱ्या विभागालाही सोडलं नाही, PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?

(Ramdev changes his mind, says he will take COVID-19 vaccine)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.