चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची काल जशी चर्चा होती, तशीच राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांवरही काल चर्चा सुरू होती. (raosaheb danve)

चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!
Raosaheb Danve

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची काल जशी चर्चा होती, तशीच राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांवरही काल चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती रावसाहेब दानवेंची. रावसाहेब दानवे यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा होती. पण झालं उलटच. प्रत्यक्षात दाजींना लॉटरी लागली. तीही रेल्वे राज्यमंत्रीपदाची. (Raosaheb Danve Union Minister of State for Railways assumed office in Rail Bhawan today)

रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. काल एकामागोमाग 12 मंत्र्यांनी राजीनामा दिले. त्यातच दानवे दाजींनी राजीनामा दिल्याचं वृत्त आलं. त्यानंतर प्रकाश जावडेकर सारख्या मातब्बर मंत्र्याने राजीनामा दिल्याचं वृत्त आल्याने मोदींनी दाजींची विकेट घेतली असणार हे पक्क झालं. महाराष्ट्रातील चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठीच दाजींचा राजीनामा घेतला असावा असा कयास वर्तवला जात होता. दाजींच्या राजीनाम्याचं वृत्त आल्याने भोकरदनमध्ये दाजींच्या कार्यकर्त्यांचा चेहरा पडला होता. तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते काहीही बोलण्यास नकार देत होते. त्यामुळे दानवे दाजींनी खरोखरच राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती.

दानवे काय म्हणाले?

ही चर्चा सुरू असतानाच दानवे मंत्रिमंडळाच्या शपथविधी पूर्वी मीडियासमोर आले. आपण राजीनामा दिला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. पक्षाध्यक्षांचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो. संजय धोत्रेंचा राजीनामा घेतल्यानंतर त्याच दरम्यान मी दिल्लीसाठी विमानात बसलो. त्यामुळे माध्यमांना वाटलं की माझाही राजीनामा होऊ शकतो. पण माझा राजीनामा पक्षानं मागितलाही नाही. तसं कुणीही मला सांगितलं नाही. त्यामुळे मोदींचा माझ्यावर विश्वास असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले.

लॉटरी लागली

दानवेंच्या राजीनाम्यांची चर्चा सुरू असतानाच त्यांना लॉटरी लागल्याचं दिसून आलं. दानवेंकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खाणकामगार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दानवेंकडे अत्यंत महत्त्वाचं खातं देण्यात आलं. त्यामुळे आता मोदी मंत्रिमंडळात दाजींचे वजन वाढल्याची चर्चा रंगत आहे. (Raosaheb Danve Union Minister of State for Railways assumed office in Rail Bhawan today)

 

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात, भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याची चौकशी

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, पण त्यांची उंची मोठी, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

भारती पवार म्हणाल्या, फडणवीसांचे आभार मानते आणि प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना हसू आवरेना, तो व्हीडीओ पुन्हा व्हायरल

(Raosaheb Danve Union Minister of State for Railways assumed office in Rail Bhawan today)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI