रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाचे निलाजरे कृत्य, मागे बसलेल्या तरुणीचा असा केला विनयभंग, Video
एका रेपिडो बाईक टॅक्सी चालकाने त्याच्या मागे बसलेल्या तरुणीची छेड काढत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार भरदिवसा घडला आहे.त्यामुळे रेपिडो बाईक टॅक्सीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहतूकीचा एक नवा पर्याय म्हणून रॅपिडो बाईक टॅक्सी हल्ली अनेक शहरात सुरु करण्यात आली आहे. परंतू या बाईकवर बसणे तरुणींसाठी किती धोकादायक आहे याचे एक उदाहरण पुढे आले आहे. बंगलोर शहरात एका तरुणीने गुरुवारी दुपारी ही बाईक टॅक्सी बुक केली. मात्र प्रवासात तिला जो धक्कादायक अनुभव आला,त्याचा तिने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या टॅक्सी बाईकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बंगलोर येथील एका तरुणीने ही रेपिडो टॅक्सी बुक केली. आणि प्रवास सुरु केला. परंतू या ड्रायव्हरने रस्त्यात तिला स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या पायांना स्पर्श केला. या संदर्भात ही तरुणी घाबरल्याने काहीही करु शकली नाही. ज्या ठिकाणी तिला पोहचायचे होते तो परिसर तिच्यासाठी नवखा असल्याने तिला बाईक थांबवण्याचे धाडस करता आले नाही. अखेर तिने सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
तरुणीने इंस्टाग्रामवर घटना शेअर केली –
या तरुणी सोशल मीडियावर लिहीलेय की मी चर्च स्ट्रीट वरुन आपल्या पीजी (Paying Guest) ला जात होते. तेव्हा रॅपिडो ड्रायव्हरने बाईक चालवताना माझे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व इतक्या पटकण झाले की मला समजलेच नाही नक्की मी काय करावे ? त्याने पुन्हा तसे केले तर मी त्याला म्हटले की भैया, क्या कर रहे हो, मत करो ? परंतू तो काही थांबला नाही.
रस्त्यात थांबली नाही, घाबरली
तरुणीने सांगितले की मी बाईक थांबवण्याची हिंमत करु शकली नाही. कारण हा एरिया माझ्यासाठी नवीन आहे. मला रस्ता माहिती नव्हता. या प्रकरणात आता विल्सन गार्डन पोलिसांनी FIR दाखल करुन तपास सुरु केला आहे. यावर सध्या तरी रॅपिडो कंपनीच्या वतीने कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
पादचाऱ्याने हिंमत दाखवली
तरुणी तिच्या लोकेशनवर पोहचल्यानंतर एका पादचाऱ्याने तिला त्रस्त असल्याचे पाहून तिला विचारले काय झाले ? त्यानंतर तरुणीने तिची आपबिती त्याला सांगितले. त्यानंतर पादचाऱ्याने ड्रायव्हर थांबवत त्याला जाब विचारला, ड्रायव्हर माफी मागितली, परंतू जाताना त्या तरुणीकडे पुन्हा बोट दाखवले, त्यामुळे ही तरुणी आणखीनच घाबरली.
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
कोणा अन्य महिलेला त्रास होऊ नये
तरुणीने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की,’ हा अनुभव मी यासाठी शेअर करत आहे की अन्य मुलींवर हा प्रसंग येऊ नये. न कॅबमध्ये , न बाईकवर, केव्हाच येऊ नये. हे पहिल्यांदाच माझ्यासोबत झालेले नाही. परंतू यावेळी जी भीती वाटली त्यामुळे मी गप्प न बसण्याचा निर्णय घेतला.’
