AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?

Antyodaya Anna Yojana : आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. यात काय बदल प्रस्तावित आहे त्याची माहिती जाणून घेऊयात.

रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?
Ration Scheme rule changeImage Credit source: Google
| Updated on: Jun 24, 2026 | 3:14 PM
Share

सरकारतर्फे देशातील जनतेला रेशन वाटप केले जाते, आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशन वितरणाच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या बदलाचा उद्देश अन्न आणि पोषण सुरक्षा अधिक मजबूत करणे तसेच वितरण व्यवस्था अधिक न्याय्य बनवणे हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रस्तावित बदल काय आहे?

सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाते. म्हणजे कुटुंबात 2-3 लोक असोत किंवा 10 लोक असोत, अशा कुटुंबांना 35 किलो धान्य दिले जाते. मात्र आता ही व्यवस्था बदलून प्रति व्यक्ती दरमहा 7 किलो धान्य देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच आता जर एखाद्या कुटुंबात 3 लोक असतील तर त्यांना फक्त 21 किलो धान्य मिळेल. या प्रस्तावामुळे छोट्या कुटुंबांना मोठा फटका बसणार आहे. सरकारने हेही स्पष्ट केले आहे की एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलो प्रतिमहिना कायम राहणार आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात 10 सदस्य असले तरीही त्या कुटुंबाला 35 किलोच धान्य मिळेल.

या बदलाचा काय फायदा होणार?

सरकारचा हा प्रस्तावित बदल लागू झाल्यास रेशन वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि समतोल निर्माण होईल. यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार धान्य उपलब्ध होईल. मोठ्या आणि गरजू कुटुंबांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

जनतेकडून सूचना मागवल्या

केंद्र सरकारने या मसुदा विधेयकावर सर्वसामान्य नागरिक, तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. आता याबाबत नागरिक 13 जुलै 2026 पर्यंत आपली मते आणि सूचना सरकारकडे पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त सूचनांचा आढावा घेऊन विधेयकात आवश्यक बदल करण्यात येतील आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Follow Us
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं