‘अमोलची माफी मागितली, सॉरी म्हटलं, कारण त्याला दुखावलं’, रविंद्र वायकर यांची विजयानंतर भावनिक प्रतिक्रिया
"मी अमोलची माफी मागितली. मी त्याला सॉरी म्हटलं. कारण तो मला भेटायला आला. त्याच्यामध्ये मोठेपणा आहे. त्याने ते दाखवून दिलं. मी त्यालासुद्धा सॉरी म्हटलं. हे असं होतंच राहतं म्हटलं", अशी भावनिक प्रतिक्रिया रविंद्र वायकर यांनी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. कधी एकेकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले रविंद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. याच मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तिकर हे उमेदवार होते. या दोन्ही उमेदवारांवरील लढत खूप अटीतटीची ठरली. रविंद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. निकालानंतर रविंद्र वायकर यांनी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया दिली. आपण अमोल कीर्तिकर यांची माफी मागितली, असं रविंद्र वायकर म्हणाले.
“मी अमोलची माफी मागितली. मी त्याला सॉरी म्हटलं. कारण तो मला भेटायला आला. त्याच्यामध्ये मोठेपणा आहे. त्याने ते दाखवून दिलं. मी त्यालासुद्धा सॉरी म्हटलं. हे असं होतंच राहतं म्हटलं. पण या सर्वमध्ये माझे सर्व कार्यकर्ते जे शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे जी काही लोकं होती, यांनी जे जीवापाड प्रेम केलेलं आहे त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तिकर यांनी दिली.
“मला यंत्रणेत तसं काही दिसलं नाही. कारण मी उशिरा आहे. मी कधीही निवडणुकीच्या वेळेला प्रमाणपत्र घ्यायला जातो. त्यापद्धतीने मी इथे आलो. अमोल दोन हजार मतांनी पुढे आहे, असं कळलं होतं. मी म्हटलं जाऊन बघुयात. मी इथे आलो. मला एक पत्रकार भेटला. मला म्हटला, तुम्ही अटीतटीची झुंज दिली. मी म्हटलं नाही. मी सर्टिफिकेटच घेऊन येतोय”, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.
‘अमोलला सॉरी बोलावच लागेल’
“या मतदारसंघात मला सगळ्यांचं काम करायचं आहे. असं नाही की, कुणी समोर उभं राहिलं तर शत्रू झालं. त्यामुळे यामध्ये अमोलही आला. सगळ्याचं काम करणं हे माझं काम आहे. त्याआधीही मी माझं केलं आहे. अमोलला सॉरी बोलावच लागेल ना. कारण आपण कुणाचं मन दुखावतो तर सॉरी बोलणं ही सर्वांची जबाबदारी असते”, असं रविंद्र वायकर म्हणाले.
“प्रत्येक मताला महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे, वाजपेयींचं एका मताने सरकार कोसळलं होतं. 48 तर भरपूर जास्त आहे. मी सांगितलं होतं की, लढणार आणि जिंकणार. मी देवाला सांगितलं होतं की, माझ्याकडून चांगलं काम होईल तरच मला जिंकून आणा”, अशी प्रतिक्रिया रविंद्र वायकर यांनी दिली.
