AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Remedesivir : कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही – WHO

कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलंय.

Remedesivir : कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आता रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही - WHO
रेमडेसिव्हीर इंजेक्शन
| Updated on: May 20, 2021 | 6:34 PM
Share

मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार पाहायला मिळाला. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंत विकलं गेलं. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटकही केली. पण आता कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं स्पष्ट केलंय. (Remedesivir injection will not be used to treat corona patients)

कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलंय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती WHOने दिली आहे.

रॉयटर्सच्या पत्राला WHOचं उत्तर

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलेल्या प्रश्नाला उत्तर देताना WHO च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, होय आम्ही Prequalification list मधून रेमडेसिव्हीर वगळले आहे. WHO कडून हा त्या देशांसाठी संदेश आहे, जे WHOच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करतात. WHO आता त्या देशांना रेमडेसिव्हीर घेण्याची शिफारस करत नाही’. त्याचबरोबर WHO ने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीरचा वापर करु नका, असा इशारा दिलाय. कारण, गंभीर रुग्णांवरही रेमडेसिव्हीरचा कुठलाही परिणाम दिसून आल्याचे पुरावे नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.

रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार

कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे या इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात होत होते. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. दीड हजाराच्या आसपास किंमत असलेलं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत विकलं जात होतं. रेमडेसिव्हीरच्या काळ्या बाजाराचे अनेक प्रकार महाराष्ट्रात समोर आले होते. दरम्यान, कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर केला जाणार नसल्याचं आता WHO ने स्पष्ट केलंय. त्यामुळे यापूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिलेल्या रुग्णांकडून आता प्रश्न विचारले जाऊ शकतात.

संबंधित बातम्या :

ब्लॅक फंगस पाठोपाठ आता व्हाईट फंगसची लागण, म्युकरमायकोसिसपेक्षाही जास्त जीवघेणं, कोणाला धोका?

पंतप्रधान मोदींकडून 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांसमोर अहमदनगरची दखल, वाचा हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची यशोगाथा काय?

Remedesivir injection will not be used to treat corona patients

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.