हृदयाचा डॉक्टरच ठरला हृदयविकाराचा शिकार, प्रसिद्ध कार्डियाक सर्जनचा हार्ट अटॅकने निधन, मृत्यूचे कारण हादरवणारे
प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे ३९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी वॉर्डमध्ये राऊंड मारत असतानाच ते कोसळले. त्यांच्या मृत्यूमुळे तरुण डॉक्टरांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या प्रमाणाची चिंता निर्माण झाली आहे. सततचा ताण, अनियमित जीवनशैली आणि आरोग्याची उपेक्षा ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

देशातील एका प्रसिद्ध कार्डियाक सर्जन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉ. ग्रॅडलिन रॉय (३९) असे या डॉक्टरांचे नाव असून ते चेन्नईच्या सेवाथा मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करत होते. सकाळी नियमितपण वार्डमध्ये राऊंड मारत असताना अचानक ते कोसळले. यानंतर करत असतानाच ते अचानक कोसळले. त्यांना उपचारासाठी लगेचच त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमंक काय घडलं?
हैदराबाद येथील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. डॉ. ग्रॅडलिन रॉय हे नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले. त्यांनी नियमितपणे सकाळी वॉर्डमध्ये राऊंड घेण्यास सुरुवात केली. अचानक त्यांना भोवळ आली आणि ते कोसळले. यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर (CPR), तातडीची अँजिओप्लास्टी (Angioplasty) आणि स्टेंटिंग (Stenting), तसेच इंट्रा-एऑर्टिक बलून पंप (Intra-aortic balloon pump) आणि ईसीएमओ (ECMO) सारखे उपचार त्यांना दिले. मात्र त्यांच्या डाव्या रक्तवाहिनीत १०० टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना हॉर्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. डॉ. रॉय यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने झालेले नुकसान भरून काढणे अशक्य आहे. डॉ. रॉय यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.
डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, ही काही पहिली घटना नाही. अलीकडच्या काळात, ३० ते ४० वयोगटातील डॉक्टरांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. डॉ. कुमार यांनी यामागची काही प्रमुख कारणे दिली आहेत. तसेच सुधीर कुमार यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. नियमित तपासणी, संतुलित जीवनशैली आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करा, अशी सूचना सुधीर कुमार यांनी दिली आहे.
- सततचा ताण: रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा दबाव, कामाचा प्रचंड ताण आणि वैद्यकीय-कायदेशीर चिंता यामुळे डॉक्टरांना सतत मानसिक तणावाखाली राहावे लागते.
- अनियमित जीवनशैली: कामाचे खूप जास्त तास, अपुरी झोप आणि बिघडलेले जैविक घड्याळ (Circadian Rhythm) यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यावर नकारात्मक परिणाम होतो.
- असंतुलित आहार: कामाच्या व्यस्ततेमुळे वेळेवर जेवण न मिळणे, रुग्णालयाच्या कॅन्टीनवरील अवलंबित्व आणि जास्त प्रमाणात कॉफी-चहाचे सेवन यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
- आरोग्याची उपेक्षा: स्वतःची आरोग्य तपासणी टाळणे आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे.
- व्यायामाचा अभाव: ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा ओपीडीमध्ये जास्त वेळ उभे राहणे किंवा बसून काम करणे, यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही.
