AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reservation Quota : महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत आरक्षणाला 50 टक्क्यांचे कुंपण; मग तामिळनाडूच अपवाद का?

देशात जातीनिहाय आरक्षणाची एक मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ही आरक्षणाची लक्ष्मणरेषा ज्या ज्या राज्यांनी ओलंडण्याचा प्रयत्न केला, त्याला न्यायव्यवस्थेने खरमरीत उत्तर दिले आहे. पण देशात तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण आहे, ते कसं शक्य झालं?

Reservation Quota : महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत आरक्षणाला 50 टक्क्यांचे कुंपण; मग तामिळनाडूच अपवाद का?
Reservation Quota
| Updated on: Jun 21, 2024 | 10:07 AM
Share

देशातील जातीनिहाय आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची सातत्याने मागणी होत आहे. अनेक जातींना आता आरक्षणाचे संरक्षण हवे आहे. शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे. पण गुरुवारी पाटणा हायकोर्टाने आरक्षणाची लक्ष्मणरेषा ओलांडता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. नितीश कुमार सरकारला मोठा झटका बसला. नितीश कुमार शासनाने राज्यात आरक्षणाची मर्यादा 65 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी जातीनिहाय 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली होती. पाटणा न्यायालयाने हा प्रकार घटनाविरोधी करार देत आरक्षण रद्द केले. पण देशात तामिळनाडूमध्ये जातीनिहाय आरक्षणाची मर्यादा 69 टक्के इतकी आहे. हा अपवाद का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

तामिळनाडूचा अपवाद का?

न्यायालयाच्या निकालानुसार, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यावर वाढविण्यात येऊ शकत नाही. यापूर्वी असे प्रयत्न अनेक राज्यांनी केले. ते कायद्याच्या कसोटीवर टिकले नाहीत. पण तामिळनाडूत गेल्या 35 वर्षांपासून जातिनिहाय 69 टक्के आरक्षण मर्यादा आहे. 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात जातीनिहाय आरक्षणाची मर्यादा 50 टक्के करण्यात आली.

1971 पर्यंत तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा 41 टक्के होती. अण्णादुराई यांचे निधन झाले. करुणानिधी हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी सत्तानाथ आयोग स्थापन केला. आयोगाच्या शिफारशीनुसार, त्यांनी ओबीसी आरक्षण 25 टक्क्यांहून 31 टक्क्यांपर्यंत वाढवले. एससी-एसटी कोटा पण 16 टक्क्यांहून 18 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यामुळे राज्यात एकूण आरक्षण मर्यादा 49 टक्क्यांच्या घरात पोहचली. 1980 मध्ये एआयएडीएमके सरकारने मागासवर्गाचे आरक्षण 50 टक्के केले. त्यामुळे राज्यात एकूण आरक्षण 68 टक्क्यांच्या घरात पोहचले. पुढे मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालानंतर 18 टक्के एससी आरक्षणा व्यतिरिक्त एसटी कोटा 1 टक्के वेगळा देण्यात आला. तामिळनाडूत आरक्षण मर्यादा 69 टक्के इतकी झाली.

आरक्षणाला मिळाले कायद्याचे संरक्षण

1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात जातीनिहाय आरक्षणाची मर्यादा 50 टक्के करण्यात आली. त्यामुळे तामिळनाडूमध्ये भूकंप आला. त्यावेळी जयललिता यांचे सरकार राज्यात होते. त्यांनी तातडीने नोव्हेंबर 1993 मध्ये विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले. आरक्षणाची मर्यादा कायम ठेवण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. हा प्रस्ताव घेऊन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांची भेट घेतली. आरक्षणाचा हा संशोधित कायदा 9 व्या सुचीत टाकण्यात आला. 9 व्या सुचीतील विषयांवर न्यायालयात खटला चालविल्या जात नाही. त्यामुळे तामिळनाडूमधील आरक्षणाची मर्यादा अजूनही अपवाद ठरली आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा