AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : RSS च्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘संघ हा..’

PM Narendra Modi : "संघाच्या 100 व्या गौरव यात्रेत भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणी जारी केली आहेत. भारतीय मुद्रेवर भारत मातेचा फोटो संभवत: स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल. या शिक्क्यावर संघाचं बोधवाक्य लिहिलं आहे" असं नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : RSS च्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, 'संघ हा..'
Narendra Modi
| Updated on: Oct 01, 2025 | 12:28 PM
Share

“आज महानवमी आहे, देवी सिद्धीदात्रीचा दिवस आहे. मी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. उद्या विजयादशमीच महापर्व आहे. अन्यायावर न्यायाचा विजय आहे. असत्यावर सत्याचा विजय, अंधकारावर प्रकाशाचा विजय. विजयादशमी हा भारतीय संस्कृती विचार आणि कलजयचा उदघोष आहे. अशा महान पर्वावर 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणं हा योगायोग नव्हता” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“हे हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या परंपेरचं पुनरुत्थान होतं. ज्यात राष्ट्र चेतना वेळोवेळी त्या युगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी नवनवीन अवतारात प्रगट होते. या युगात संघ त्या अनादी राष्ट्र चेतनेचा पुण्यअवतार आहे. मित्रांनो आमच्या पिढीच्या स्वयंसेवकांच सौभाग्य आहे की, संघ शताब्दी वर्षाचा महान प्रसंग पहायला मिळतोय. मी आज या प्रसंगी राष्ट्रसेवेच्या संकल्पाला, समर्पित कोटी, कोटी स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. संघाचे संस्थापक परमपूज्य हेडगेवारजींच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या शिक्क्यावर संघाचं बोधवाक्य

“संघाच्या 100 व्या गौरव यात्रेत भारत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि नाणी जारी केली आहेत. भारतीय मुद्रेवर भारत मातेचा फोटो संभवत: स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल. 100 वर्षाच्या या गौरव यात्रेत सरकारने विशेष टपाल तिकीट आणि शिक्का जारी केलाय. 100 रुपयाच्या या नाण्यावर एकाबाजूला राष्ट्रीय चिन्ह आणि दुसऱ्याबजूला भारत मातेचा फोटो आणि समर्पण भावनेने नमन करताना स्वयंसेवक दिसतात. या शिक्क्यावर संघाचं बोधवाक्य लिहिलं आहे. आज विशेष स्मृती टपाल तिकीट जारी केलय. त्याचं महत्व आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं किती महत्व असतं, 1963 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा परेडमध्ये सहभागी झालेले. “या तिकीटामध्ये त्याच ऐतिहासिक क्षणांची स्मृती आहे. संघाचे जे स्वयंसेवक देशसेवेमध्ये आहेत, त्यांची झलक टपाल तिकीटात दिसते. मी यासाठी देशवासियांना शुभेच्छा देतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचा प्रयत्न झाला’

“संघाबद्दल असं म्हटलं जातं की, यात सामान्य लोक मिळून असामान्य काम करतात. संघाची शाखा अशी प्रेरणाभूमी आहे, जिथे अहमकडून वहमकडे प्रवास सुरु होतो” असं पीएम मोदी संघाच कौतुक करताना म्हणाले. “संघाच्या शाखेत शारीरिक आणि मानसिक विकास होतो. संघासाठी देश पहिला आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत संघ सहभागी झालेला. 1942 साली इंग्रजांविरोधात आंदोलनात संघाच्या स्वयंसेवकांनी अत्याचार सहन केला. संघाने खूप बलिदानं दिली आहेत. संघाच लक्ष्य एक भारत, श्रेष्ठ भारत आहे, संघावर हल्ले सुद्धा झाले. संघाविरुद्ध कारस्थानं झाली. स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचा प्रयत्न झाला” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.